नदीकाठ सुशोभीकरणासाठी साडेचार सहस्र कोटींचा खर्च होणार !

झाडे तोडण्यासाठी पुणेकरांचा विरोध !

बंडगार्डन येथील नदीकाठ

पुणे – बंडगार्डन येथील नदीकाठी सुशोभीकरणाच्या नावाखाली अडथळा ठरणारी झाडे कापण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेने वृत्तपत्रात विज्ञापन देऊन हरकती आणि सूचना नोंदवण्याचे आवाहन केले होते. यावर शेकडो नागरिकांनी हरकती नोंदवल्या आहेत.

पालिकेने बंडगार्डन येथे नदीकाठ सुशोभीकरणाला प्रारंभ केला आहे. या सुशोभीकरणासाठी साडेचार सहस्र कोटी रुपयांचा खर्च होणार असून सुशोभीकरणासाठीच तेथील सहस्रो झाडे तोडणार आहेत; मात्र याला पुणेकरांचा विरोध आहे. नदीकाठी सुशोभीकरण करण्याऐवजी तिला स्वच्छ करावे, अशी पुणेकरांची मागणी आहे; परंतु ‘महापालिका याकडे दुर्लक्ष करून सुशोभीकरणावर भर का देत आहे ?’, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.

संपादकीय भूमिका

  • नदी स्वच्छ न करता केवळ नदीकाठ सुशोभीकरणातून काय साध्य होणार आहे ?

  • प्रदूषणामुळे नदीच्या पाण्याला दुर्गंध येत असल्याने नदीकाठ सुशोभित केला, तरी दुर्गंधी कायमच राहील, हे प्रशासनाच्या लक्षातयेत नाही का ?

  • नदीपात्रामधून स्वच्छ पाणी वाहील, याकडेच प्रशासनाने लक्ष द्यावे !