कर्णावती (गुजरात) – गुजरातमधून वर्ष २०१६ ते २०२० या ५ वर्षांत ४१ सहस्रांहून अधिक महिला बेपत्ता झाल्याची माहिती ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी आयोगा’च्या अहवालातून समोर आली आहे. वर्ष २०१६ मध्ये ७ सहस्र १०५, वर्ष २०१७ मध्ये ७ सहस्र ७१२, वर्ष २०१८ मध्ये ९ सहस्र २४६, वर्ष २०१९ मध्ये ९ सहस्र २६८, तर वर्ष २०२० मध्ये ८ सहस्र २९० मुली आणि महिला बेपत्ता झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये अल्पवयीन मुलींच्या आकडेवारीचा समावेश नाही.
गुजरात में 5 साल में 40 हजार महिलाएं लापता, NCRB के आंकड़ों से खुलासाhttps://t.co/3TgYIauRyz
— Hindustan (@Live_Hindustan) May 7, 2023
संपादकीय भूमिकादेशभर मुली आणि महिला यांचे बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण पहाता, हे आता ‘राष्ट्रीय संकट’ घोषित करून ते रोखण्यासाठी केंद्र अन् राज्य सरकारे यांनी युद्धपातळीवर पावले उचलणे आवश्यक आहे ! |