प्रकल्पाला भूमी देणार्‍या शेतकर्‍यांना आस्थापनाचे भागधारक म्हणून सामावून घ्या ! – माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत

बारसू (राजापूर) येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे राजकारण

राजापूर – तालुक्यात बारसू येथे प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पात ज्या शेतकर्‍यांच्या भूमी संपादीत होणार आहेत, त्या शेतकर्‍यांना तेलशुद्धीकरण प्रकल्प करणार्‍या आस्थापनाने भागधारक म्हणून सामावून घ्यावे, अशी मागणी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले की,

सदाभाऊ खोत

१. या प्रकल्पाविषयी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी आणि संशयास्पद आहे.

२. कोकणात प्रकल्प उभारत असतांना तेथील शेतकर्‍याला या प्रकल्पामध्ये सामावून घेतले पाहिजे.

३. शेतकरी हा त्या आस्थापनाचा भागधारक झाला, तर हा शेतकरी त्या आस्थापनाचा मालक होईल.

४. आज जर शेती व्यवसाय भरोशाचा राहिला असता आणि त्यातून भरघोस उत्पन्न मिळाले असते, तर राजकारण्यांनी स्वत:च्याच नावावर सात-बारा करून ते शेतकरी झाले असते. त्यामुळे भविष्यात शेतकर्‍यांना चांगले पैसे कसे मिळतील ? त्यातून त्यांच्या मुला-बाळांचे शिक्षण कसे होईल ? त्यांना रोजगार कसा मिळेल ? यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

५. शेतकर्‍याला भागधारक करून घेतल्यास अनेक शेतकरी ‘आमच्या भूमी घ्या’ म्हणून पुढे येतील आणि त्यांचा प्रकल्पाला विरोध रहाणार नाही.