अमेरिकेतील आक्रमणकर्त्‍याने केलेल्‍या अंदाधुंद गोळीबारात ८ जण ठार !

अमेरिकेतील टेक्‍सास शहरातील प्रीमियम आऊटलेट मॉल

न्‍यूयॉर्क – अमेरिकेतील टेक्‍सास शहरातील प्रीमियम आऊटलेट मॉलमध्‍ये झालेल्‍या गोळीबारात ८ जण ठार, तर ७ जण घायाळ झाले. पोलिसांनी आक्रमणकर्त्‍याला ठार केले आहे. घायाळ झालेल्‍यांमध्‍ये लहान मुलांचाही समावेश आहे. प्रत्‍यक्षदर्शींनी दिलेल्‍या माहितीनुसार आक्रमणकर्ता काळे कपडे घालून आला होता. टेक्‍सासमध्‍ये २१ वर्षांवरील तरुणांना बंदूक बाळगण्‍याचा परवाना दिला जातो. यासाठी त्‍याच्‍यावर पूर्वी गुन्‍हा नोंद नसणे बंधनकारक आहे. बंदूक बाळगण्‍यासाठी काही ठराविक निर्बंध घालण्‍यात आले आहेत. टेक्‍सासमध्‍ये रिपब्‍लिकन पक्षाची सत्ता आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिकी समाज हा सुधारणावादी आणि पुढारलेला असतांनाही तेथे सार्वजनिक ठिकाणी वारंवार अशा प्रकारचे आक्रमण का होते ? अशा घटना समाजातील अस्‍वस्‍थता दर्शवतात. ऊठसूठ भारताला उपदेश करणार्‍या तेथील तथाकथित समाजधुरिणांनी आधी स्‍वतःच्‍या देशातील या स्‍थितीचा विचार करावा !