बिहारच्या शिक्षणमंत्र्यांची पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना अप्रत्यक्ष धमकी
पाटलीपुत्र (बिहार) – संत तुलसीदास लिखित श्रीरामचरितमानसवर टीका करणारे बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यादव यांनी आता बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना लक्ष्य केले आहे. यादव म्हणाले, ‘‘जर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री बिहारमध्ये वाईट कामे करण्यासाठी येतील, तर त्यांना बिहार अनुमती देणार नाही. जर ते द्वेष पसरवण्यासाठी येतील, तर पूर्वी ज्या प्रमाणे लालकृष्ण अडवाणी कारागृहात गेले होते, तसे अन्यही लोक जातील’’, अशी अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. येत्या १३ मे या दिवशी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री बिहारमध्ये येणार आहेत. पाटलीपुत्र येथे त्यांचा दरबार असणार आहे. यापूर्वी लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि राज्याचे मंत्री तेजप्रताप यादव यांनीही पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या बिहारच्या दौर्यावरून धमकी दिली होती.
सौजन्य एनस नाऊ
चंद्रशेखर यादव पुढे म्हणाले की, पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री हे कोणतेही बाबा नाहीत आणि ते कोणताही चमत्कार करत नाहीत. ते आणि त्याची लोक धर्माच्या नावाखाली व्यापार करत आहेत.
संपादकीय भूमिकाधर्मांध मुसलमान नेते बिहारमध्ये द्वेष पसरवणारी विधाने करतात, दंगली घडवतात, त्यांच्यावर जनता दल (संयुक्त) आणि राजद यांचे सरकार कारवाई करत नाही; मात्र प्रेम आणि भक्ती वाढवणार्या हिंदूंच्या संतांवर अशी कारवाई करण्याची धमकी देतात, हे लक्षात घ्या ! |