हनुमान मंदिर नारकरवाडी, पाचल येथे ‘सनातन प्रभात’चा वाचक मेळावा
पाचल (राजापूर), ३ मे (वार्ता.) – ‘सनातन प्रभात’मध्ये केल्या जाणार्या आध्यात्मिक दिशादर्शनामुळे ‘सनातन प्रभात’ आणि वाचक यांच्यामध्ये कुटुंबभावना निर्माण झाली आहे. ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि विज्ञापनदाते हे आता साधक बनले आहेत, हेच ‘सनातन प्रभात’चे यश आहे, असे उद्गार सनातन संस्थेचे साधक श्री. उदय केळुसकर यांनी काढले.
रविवार, ३० एप्रिल २०२३ या दिवशी नारकरवाडी (पाचल) येथील श्री हनुमान मंदिरात ‘सनातन प्रभात’चा वाचक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या मेळाव्याला २५ वाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांची उपस्थिती लाभली.
श्री. उदय केळुसकर पुढे म्हणाले की, ‘सनातन प्रभात’ वर्ष २००१ पासून हिंदूंची हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी वैचारिक सिद्धता करत आहे. वाचकांचे आध्यात्मिक स्तरावर, तसेच हत्या, बलात्कार, भ्रष्टाचार, दंगली अशा रज-तम बातम्यांमधून प्रक्षेपित होणार्या नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण व्हावे, यासाठी ‘सनातन प्रभात’च्या पानांना श्रीकृष्णाच्या नामजपाचे मंडल घालण्यास आरंभ झाला.
सर्वांना मार्गदर्शन करणारे ‘सनातन प्रभात’ नियतकालिक घराघरांत पोचवण्यासाठी प्रयत्न करा आणि सामाजिक माध्यमाच्या माध्यमातून ‘सनातन प्रभात’चा प्रसार करा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
वाचक मेळाव्याचा प्रारंभ श्री हनुमंताला श्रीफळ आणि हार अर्पण करून झाला. सूत्रसंचालन कुमारी दीप्ती चिंचळकर यांनी केले. श्री. श्रीकृष्ण नारकर यांनी वाचक मेळाव्याचा उद्देश सांगितला. सनातन संस्थेचे श्री. उदय केळुसकर यांचे स्वागत वाचक श्री. प्रभाकर पाथरे यांनी केले.
वाचकांचे मनोगत
१. श्री. सदानंद ताम्हणकर : दैनिक ‘सनातन प्रभात’ हिंदूमध्ये जागृती करत असून तो धर्माचा दीपस्तंभ आहे.
२. अधिवक्ता श्री. चंद्रकांत कडू : असे वाचक मेळावे पंचक्रोशीत घेण्यात यावेत. तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’ हे दैनिक गावातील वाचनालयात अथवा ग्रामदेवी मंदिरात देण्यात यावा.
हा मेळावा यशस्वी होण्यासाठी श्री हनुमान मित्र मंडळ नारकरवाडी, श्री. तेजस नारकर, श्री. भरत वापिलकर, श्री. शरद मोरे , श्री. अर्जुन अनदाणी, श्री मंगेश रबसे आदींचे साहाय्य लाभले.