मंदिराचा झेंडा फेकून इस्लामी झेंडा फडकावणार्‍या धर्मांध सरपंचास अटक

मध्यभागी सरपंच महंमद आरिफ

बरेली (उत्तरप्रदेश) – मंदिराचा झेंडा फेकून इस्लामी झेंडा फडकावल्याच्या प्रकरणी बरेली येथील सरपंच महंमद आरिफ यास अटक करण्यात आली. त्याच्यावर यापूर्वीच अनेक गुन्हे नोंद आहेत. ३२ वर्षीय आरिफ हा भीकमपूर गावाचा प्रमुख आहे.

आरिफ याने वरील संतापजनक कृत्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित केला. त्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून भ्रमणभाष हस्तगत करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

  • धार्मिक सौहार्द नेहमी कोण बिघडवतात, हेच या घटनेवरून दिसून येते !
  • असे धर्मांध सरपंच गावाचा कारभार कसा हाकत असतील, याचा विचारच न केलेला बरा !