५ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याच्या संशयावरून नईम यास अटक !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथील जहांगीराबाद भागामध्ये ५ वर्षांची एक मुलगी तिच्या शेजारील घरात मृतावस्थेत आढळली. तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला असून त्यांना त्यांच्या घराशेजारी रहाणार्‍या नईमवर संशय आहे. नईम याला अटक करण्यात आली आहे.
२४ एप्रिलला मुलगी घराबाहेर खेळत असतांना अचानक गायब झाली. दोन घंटे झाले, तरी तिचा पत्ता लागेना; म्हणून कुटुंबियांनी तिला शोधण्यास आरंभ केला. त्या वेळी शेजारी असलेल्या नईमच्या घरात ती मृत असल्याचे आढळले. नईम नशेत बेशुद्धावस्थेत असल्याचेही समोर आले. नईमने मुलीवर अत्याचार केल्याचा कुटुंबियांनी आरोप केला असून त्याने याआधीही अशा प्रकारे प्रयत्न केले असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका 

अशा वासनांधांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत !