दुर्ग (छत्तीसगड) येथे २५० ख्रिस्त्यांनी केली घरवापसी !

आता परतलेल्या हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये धर्माभिमान जागृत करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !

(घरवापसी म्हणजे हिंदु धर्म त्यागून अन्य पंथात गेलेल्यांना पुन्हा हिंदु धर्मात घेणे)

प्रतिकात्मक छायाचित्र

दुर्ग (छत्तीसगड) – ‘राष्ट्र रक्षा महासंमेलन आणि घरवापसी २०२३’ या मोहिमेच्या अंतर्गत २५० लोकांची (१०० कुटुंबांची) घरवापसी करण्यात आली. या वेळी छत्तीसगड येथील भाजपचे नेते आणि ‘अखिल भारतीय घर वापसी’ उपक्रमाचे प्रमुख प्रबल प्रताप सिंह जुदेव हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्याकरवी घरवापसी केलेल्या हिंदूंचे हिंदु धर्मात अधिकृत स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन ‘सर्वहितकारिणी मानव सेवा संस्थान’ आणि समस्त हिंदु संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

गेल्या वर्षभरात जुदेव यांच्या नेतृत्वाखाली साधारण ३ सहस्र लोकांची घरवापसी करण्यात आली आहे.

जानेवारी २०२३ : छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यात साधारण १ सहस्र १०० ख्रिस्त्यांनी हिंदु धर्म स्वीकारला.
ऑक्टोबर २०२२ : ओडिशा राज्यातील सुंदरगड जिल्ह्यात १७३ ख्रिस्ती कुटुंबांतील साधारण ५०० लोकांनी घरवापसी केली.
मार्च २०२२ : छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यात १ सहस्र २५० ख्रिस्त्यांनी स्वीकारला हिंदु धर्म !

जोपर्यंत प्राण आहे, तोपर्यंत घरवापसी करून सनातन धर्मरक्षा करीन ! – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे नेते प्रबल प्रताप सिंह जुदेव

दुर्ग येथील घरवापसीच्या कार्यक्रमाला संबोधित करतांना प्रबल प्रताप सिंह जुदेव म्हणाले की, हिंदूंचे धर्मांतर हे देश तोडण्याचे सर्वांत मोठे षड्यंत्र आहे. यासाठी घरवापसीचे कार्यक्रम राबवणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत देहात प्राण आहे, तोपर्यंत मी घरवापसीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सनातन धर्मरक्षा करत राहीन. छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार नेहमीच ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या हिंदूंच्या धर्मांतराच्या कारवायांकडे कानाडोळा करत आले आहे.

संपादकीय भूमिका

  • असे हिंदुत्वनिष्ठच हिंदु धर्माची खरी शक्ती होय !