‘बीबीसी’च्‍या माध्‍यमातून भारताच्‍या विरोधात ‘माहिती युद्ध’ ! – श्रीलक्ष्मी राजकुमार, पत्रकार, कर्नाटक

‘बीबीसी’च्‍या ‘डॉक्‍युमेंट्री’मध्‍ये (लघुपटामध्‍ये) पंतप्रधान मोदींवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण केले आहे. हे प्रश्‍नचिन्‍ह केवळ मोदींवर नसून भारताच्‍या जनतेवरही आहे; कारण भारतीय जनतेने मोदीजींना निवडून दिले आहे. ‘बीबीसी’ला चीनच्‍या आस्‍थापनांकडून आर्थिक पुरवठा केला जात असून त्‍या माध्‍यमातून भारताच्‍या विरोधात ‘माहिती युद्ध’ छेडले आहे. ‘वर्ष २०२४ च्‍या निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर हे केले जात आहे’, अशी शंका निर्माण केली जात आहे. भारत आता एक जागतिक नेतृत्‍व बनत असून त्‍याला कमकुवत करण्‍याचे कारस्‍थान ‘बीबीसी’ आणि त्‍याला पाठिंबा देणारे करत आहेत.