‘सनातनच्या कार्याचा विस्तार जसजसा वाढत आहे, तसतसे सनातनप्रती आस्था असणार्या हितचिंतकांच्या संख्येतही वाढ होत आहे. समाजातील अनेक जिज्ञासू ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे नियमित वाचन करतात. बरेच उद्योगपती आणि अधिवक्ते स्वत:चा व्यवसाय सांभाळून संस्थेच्या राष्ट्र-धर्माच्या कार्याला निरपेक्षपणे साहाय्य करतात. विज्ञापने देऊन किंवा धनरूपात अर्पण करून सनातनच्या धर्मकार्यात योगदान देणार्या हितचिंतकांची संख्याही अधिक आहे.
साधक बर्याचदा अंकवितरण करणे, विज्ञापने आणणे किंवा अर्पण मिळवणे, अशा निमित्तांनी या हितचिंतकांना भेटतात; पण एरव्हीही त्यांची भेट घेऊन त्यांना नवीन उपक्रमांची माहिती देणे, साधना सांगणे, त्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण करणे आदी प्रयत्न करत नाहीत. खरेतर ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आरंभलेले अध्यात्म आणि धर्म प्रसारकार्य सर्वांपर्यंत पोचवणे अन् साधनेची आवड असलेल्या प्रत्येक जिज्ञासूला योग्य साधनेप्रत नेणे’, हीच साधकांची खरी समष्टी साधना आहे.
या दृष्टीने साधकांनी हितचिंतकांना अधूनमधून प्रत्यक्ष भेटावे. त्यांची आवड ओळखून त्यांना साधनेची पुढील दिशा द्यावी आणि त्यांना साधनेतील आनंद अनुभवता येण्यासाठी प्रयत्न करावा.
साधकांनो, ‘सनातनशी जोडलेले वाचक, हितचिंतक आणि जिज्ञासू यांना साधनेची योग्य दिशा देऊन समष्टी साधना करा आणि समाजऋणातून मुक्त व्हा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.३.२०२३)