फॅशन म्हणून मंगळसूत्र न घालण्याची चूक करू नका !

अनेक महिला पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून विवाह झाल्यानंतरही मंगळसूत्र घालत नाहीत किंवा फॅशन म्हणून मंगळसूत्र गळ्यात घालण्याऐवजी हातात घालतात, तसेच काही ठिकाणी अविवाहित महिलाही मंगळसूत्र घालतात. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे हिंदु धर्मामध्ये सांगितलेल्या प्रत्येक कृतीच्या मागे शास्त्र आहे, हे लक्षात येत नाही. महान हिंदु धर्मामध्ये सांगितलेल्या प्रत्येक कृती मागील शास्त्र समजून घेऊन कृती केल्यास त्याचा लाभ होतो.

मंगळसूत्राचे महत्त्व

१. मंगळसूत्र हा सर्वांत अधिक प्रमाणात ईश्वरी तत्त्व आकृष्ट करणारा अलंकार आहे.

२. मंगळसूत्रादी सौभाग्यालंकार म्हणजे स्त्रीला तिच्या पातिव्रत्याची जाणीव करून देणारे, तसेच तिचे वाईट शक्तींपासून रक्षण करणारे माध्यम आहे.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.