लोकहो, विवाहबाह्य संबंधांच्या विकृती-विरुद्ध संघटितपणे प्रयत्न करा !

विवाहबाह्य संबंधांची विकृती थोपवायची असेल, तर शासन, प्रसारमाध्यमे आणि प्रतिष्ठित यांच्याकडून तिला मिळणारे प्रोत्साहन रोखायला हवे. त्यासाठी –

१. विवाहबाह्य संबंधांना प्रोत्साहन देणार्‍या निर्णयांना विरोध करण्यासाठी शासनाला पत्रे वा सामूहिक निवेदने पाठवा आणि विवाहबाह्य संबंधांविरुद्ध कायदा करण्यासाठी शासनाला भाग पाडा !

२. विवाहबाह्य संबंधांना प्रोत्साहन देणार्‍या दूरचित्र-वाणीवरील मालिका, तथाकथित प्रतिष्ठित यांचा निषेध नोंदवण्यासाठी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घाला !

३. मुला-मुलींना धर्मसत्संगात पाठवा, म्हणजे धर्मशिक्षण घेऊन ती नीतीमान बनतील आणि अनाचारांपासून परावृत्त होतील.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – विवाहसंस्कार)