प्रसिद्ध ‘रॅपर’ बादशाह याच्या अश्‍लील गाण्यात भगवान शंकरांचा उल्लेख !

पुजारी आणि हिंदु संघटना यांचा विरोध

(रॅपर म्हणजे गाणे अत्यंत जलद आणि एका लयीत गाणारा)

प्रसिद्ध ‘रॅपर’ बादशाह

उज्जैन (मध्यप्रदेश) – प्रसिद्ध ‘रॅपर’ बादशाह याच्या सनक या गाण्यांच्या संग्रहामधील एका गाण्यात भगवान शंकराचा उल्लेख करण्यात आला आहे; मात्र या गाण्याचे बोल अश्‍लील आहेत. यावर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या येथील श्री महाकाल मंदिरातील पुजार्‍यांनी आक्षेप घेतला आहे. यासह महाकाल सेना, पुजारी महासंघ आणि हिंदु संघटना या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करणार आहेत.

सनातन धर्मातील लवचिकतेचा दुरुपयोग करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या गाण्यातील ‘भोलेनाथ से मेरी बनती है’ असा उल्लेख आहे. गाण्याच्या याच भागावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. या आक्षेपावर अद्याप बादशाहकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

संपादकीय भूमिका

  • मध्यप्रदेशातील भाजप सरकारने यावर स्वतःहून कारवाई करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !