‘व्यक्ती, समूह, समाज, गाव, नगर, राज्य, देश अशा सर्वांच्या कर्मांची गणना ईश्वराकडे असते आणि या गणनेप्रमाणे सर्वांना त्याची फळे भोगावी लागतात. याकरता प्रत्येक देशाने ईश्वराला स्मरून कार्य करावयास हवे. ईश्वराला विसरल्याने अनेक साम्राज्ये आतापर्यंत उद्ध्वस्त झालेली आहेत. दुसर्या महायुद्धाच्या काळात एक दिवस एक फकीर मुंबई बंदरानजीक ‘अरे ! जान बचाना है तो भाग जाव !’ असे जोरजोराने ओरडत फिरत होता. त्याला वेडा समजून कुणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. दोन दिवसांनंतर मुंबई बंदरात प्रचंड स्फोट झाला. अनेक घरे कोसळली आणि शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.’
(मानवी जीवनातील गूढ रहस्ये, भाग ३, पृष्ठ क्र. ३७. लेखक : स्वामी दत्तावधूत)