देहली दंगलीचे ३ वर्षांनंतरचे भीषण वास्तव !

दंगलीमधील हिंदु पीडितांना ३ वर्षांनंतरही न्याय न मिळू शकणे, हे प्रशासनासह हिंदूबहुल भारताला लज्जास्पद !

‘वर्ष २०२० चे २४ आणि २५ फेब्रुवारी हे दोन दिवस देहलीतील आबालवृद्धांपैकी कुणीही विसरू शकणार नाहीत. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (‘सीएए’च्या) विरोधात अनेक मास चाललेल्या आंदोलनाने उपरोक्त दिवशी उत्तर-पूर्व देहलीमध्ये दंगलीचे प्रचंड रूप घेतले होते. काही ठिकाणी दिवसाढवळ्या दगडफेक करण्यात आली, तर काही ठिकाणी रस्त्यांवर पोलिसांना गोळ्या घातल्या गेल्या. हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी इमारतींवर मोठमोठे गलोल ठेवले होते, तसेच कित्येक घरांमध्ये दारूगोळा आणि पेट्रोल बाँब लपवले गेले होते. जेव्हा दंगल थोडीफार शांत झाली, तेव्हा मरणार्‍यांची संख्या ५३ वर पोचली होती आणि घायाळांची संख्या २०० हून अधिक झाली होती. आजही ते दिवस आठवले, तर अंगाचा थरकाप उडतो आणि उत्तराखंडमधील निवासी त्या दिलबर नेगीचा तोंडवळा समोर येतो, ज्याच्या शरिराचे अवयव कापून अग्नीमध्ये फेकले जात होते. गुप्तचर विभागाचे कर्मचारी अंकित शर्मा यांची निर्घृण हत्या, तर कुणीच विसरू शकत नाही. त्यांच्या शरिरावर ४०० हून अधिक ठिकाणी सुर्‍याने भोसकले होते आणि त्यांचा मृतदेह नाल्यामधून कह्यात घेण्यात आला होता.

या हिंदुविरोधी दंगलीला २५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी ३ वर्षे पूर्ण झाली असून जनजीवन सामान्य झाले आहे; परंतु ज्यांना ‘अल्ला हू अकबर’ आणि ‘नारा-ए-तकबीर’च्या घोषणा देत तडफडून मारण्यात आले. त्यांचे भयानक आक्रोश हिंदू विसरले असतील, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. असे असतांना डाव्या विचारसरणीच्या प्रसारमाध्यमांनी या दंगलीला केवळ आंदोलनाचे हिंसक रूप म्हणून दाखवले होते. त्यामुळे या घटनांमागील भीषण वास्तव समोर आणण्यासाठी आणि पीडितांवर बेतलेला प्रसंग आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी त्या वेळी ‘ऑप इंडिया’ने पुढाकार घेतला आहे. ‘ऑप इंडिया’चे अनुपम कुमार सिंह, याच संस्थेशी संबंधित माजी पत्रकार रवी अग्रहरी आणि केशव मालान यांनी पीडितांच्या घरी भेटी दिल्या, काहींशी दूरभाषवरून संपर्क साधला अन् त्यांच्या कुटुंबातील स्थिती जाणून घेतली. त्यानंतर या दंगलीच्या २ दिवसांचे भीषण वास्तव आपल्यासमोर येथे देत आहोत की, जे सांगण्यासाठी इतर प्रसिद्धीमाध्यमे कचरत होती.

१. देहली दंगलीमुळे करावलनगर आणि शिव विहार या भागात सर्वाधिक हानी !  

देहली येथील दंगलीमध्ये करावलनगर आणि शिव विहार या भागात सर्वाधिक हानी झाली होती. या भागातील हिंदु शाळेची एक इमारत जाळण्यात आली होती, तसेच दुकानांना आग लावण्यात आल्याने त्यांची राख झाली होती. लोकांमध्ये केवळ आक्रोश होता. ‘यात त्यांची काय चूक होती ?’, एवढेच ते विचारत होते. त्यांनी सांगितले की, दंगलीचे हे दोन दिवस ते केवळ त्यांच्या मुलाबाळांची अब्रू वाचवण्यासाठी रस्त्यावर राहिले आणि धर्मांधांच्या जमावाच्या गोळ्या अन् दगडफेक यांचा मारा सहन केला.

२.हिंदूंच्या घरांची जाळपोळ आणि पोलिसांवर ॲसिडचे आक्रमण

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, त्या दिवशी राजधानी शाळेच्या वर (जी एका धर्मांधाची होती.) ३०० हून अधिक दंगलखोर गोळा होऊन हिंदूंना लक्ष्य करत होती. तसेच धर्मांध महिला त्यांच्या घराच्या छतावर उभ्या राहून पोलिसांवर ॲसिड  (आम्ल) फेकत होत्या. तेथे असेही समजले की, राजधानी शाळेवर चढून दंगलखोरांनी दिनेश मुंशी नावाच्या व्यक्तीच्या डोक्यात गोळी मारली. तसेच अन्य हिंदूंवर गलोलने दगडफेक आणि बाँबफेक केली.

३. मोठमोठ्या कंटेनरमध्ये दगड आणून ठेवले ! 

आम्हा पत्रकारांना समजले की, राजधानी शाळेचा वापर आक्रमण तळासारखा करण्यात आला. आम्ही त्या शाळेच्या छतावर पोचलो, तेव्हा तेथे मोठमोठे कंटेनर आढळून आले. याच मोठमोठ्या कंटेनरमध्ये भरून दगड आणण्यात आले होते आणि त्यांचा सतत वापर करण्यात आला होता. ते दृश्य पाहून एक गोष्ट स्पष्ट होती की, दंगलीची सिद्धता अनेक दिवसांपासून चालू होती. केवळ २४ आणि २५ फेब्रुवारी २०२० या दिवशी आक्रमणाची संधी साधण्यात आली. याच शाळेच्या बाजूला लग्नाचे एक सभागृह होते. तेथे अनेक वाहने उभी होती; पण दंगलखोरांनी तेथेही आग लावून सर्वांची राखरांगोळी केली.

४. अजूनही हिंदू जगत आहेत भीतीच्या छायेत ! 

‘ऑप इंडिया’चे माजी प्रतिनिधी केशव मालान हे दंगलीनंतर अनेक दिवस हानी झालेल्या भागांमध्ये फिरून सत्यस्थिती गोळा करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांचा एका महिलेशी रिक्शामध्ये वार्तालाप झाला. प्रतिनिधीने न विचारताच या महिलेने त्यांना सत्यस्थिती सांगितली. ती म्हणाली, ‘‘धर्मांधांचा जमाव लाठीकाठी, विटा-दगड, लोखंडी सळ्या घेऊन मुख्य मार्गावर निघाला होता. ते हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी त्यांची मुले आणि महिला यांना घराबाहेर काढत होते.’’ शेवटी प्रतिनिधीने त्या महिलेचे नाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने सांगितले की, तिचे नाव बातमीत देऊ नका, अन्यथा धर्मांधांचा जमाव तिला जिवंत ठेवणार नाही.

५. फेरफटका मारायला गेलेल्या आलोक यांची हत्या होणे ! 

‘ऑप इंडिया’चे प्रतिनिधी अनेक दिवस चांदबाग, करावलनगर, शिव विहार यांसह देहलीच्या उत्तर-पूर्व  भागांमध्ये फिरले. या काळात त्यांना प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्याचे आढळले. हानी झालेल्या भागांमध्ये जाण्यापूर्वी त्यांची भेट प्रथम दंगल पीडित आलोक तिवारी यांच्या पत्नीशी झाली. तिने सांगितले की, तिचे पती जेवणानंतर रात्री १० वाजता बाहेर फिरायला गेले होते; पण ते परत आलेच नाहीत. अर्ध्या घंट्यानंतर एक दूरभाष आला. त्यावरून तिला समजले की, तिच्या पतीला मारण्यात आले आहे. आलोकचा अंत्यसंस्कार वर्गणी गोळा करून करण्यात आला.

६. ‘दुआ सलाम’ (नमस्कार) करणार्‍या मुलीच्या लग्नाच्या सिद्धतेला धर्मांधांनी आग लावणे !

आलोक यांच्या घरानंतर ‘ऑप इंडिया’च्या प्रतिनिधीला चांदबागच्या अशा घराची माहिती मिळाली की, जेथे काही दिवसांपूर्वी एका मुलीच्या लग्नाची सिद्धता चालू होती; परंतु दंगलीनंतर तेथील वातावरण पूर्णपणे शोकमग्न झाले होते. चीड या गोष्टीची होती की, धर्मांधांच्या जमावाने त्या मुलीच्या लग्नाची जी सिद्धता झाली होती, त्याला त्यांनी आग लावली होती. ही  मुलगी येता-जाता त्यांना ‘दुआ सलाम’ करत होती.

७. दुकान तोडून सर्वकाही लुटले ! 

या काळात ‘ऑप इंडिया’चे प्रतिनिधी हे आम आदमी पक्षाचे नेते ताहिर हुसैनच्या घराजवळ पोचले. जे घर त्या वेळी दंगलखोरांचा अड्डा बनले होते. तेथे अंकित शर्मा यांना निर्घृणपणे ठार करण्यात आले होते. हे प्रतिनिधी फिरत असतांना त्यांना ‘श्याम चहावाले’ भेटले. श्याम विमनस्क स्थितीत भूमीवर बसले होते. विचारपूस केल्यावर त्यांनी धर्मांधांच्या जमावाने त्यांचे दुकान तोडून त्यांचे सर्वकाही कसे लुटून नेले, याविषयीचा कटू अनुभव सांगितला.

८. धर्मांधांच्या जमावाने मुलींना नग्नावस्थेत घरी पाठवले ! 

एका महिलेने ओळख न सांगण्याच्या अटीवर तिने माहिती सांगितली. तिने दंगलीचे ते दोन दिवस मुलींसाठी किती भयानक होते, याची माहिती सांगितली. तिने सांगितल्यानुसार जमावाने शिकवणी वर्गावरून परतणार्‍या मुलींना त्यांचे कपडे उतरवायला लावले आणि त्यांना नग्नावस्थेत घरी पाठवले.

९. घराबाहेर निघालेल्या राहुलची दंगलखोरांनी केली गोळी घालून हत्या !

बृजपुरीमध्ये राहुल ठाकूरच्या हत्येविषयी प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, त्या दिवशी राहुल केवळ दंगलीचे वातावरण पहाण्यासाठी घराबाहेर निघाला होता. तेवढ्यात समोरून शस्त्रधारी जमावातून एका धर्मांधाच्या एका बंदुकीच्या गोळीने त्याचा वेध घेतला आणि तो तेथेच खाली पडला. त्याच्या घरचे त्याला रुग्णालयात घेऊन गेले; पण तो वाचू शकला नाही. राहुलच्या घरी गेल्यावर आमच्या प्रतिनिधीला त्याच्या आईचा आक्रोश ऐकायला मिळाला. त्याचे वडील राखीव पोलीस दलाच्या (‘आर्.पी.एफ्.’च्या) बंदोबस्तात होते. ते पुन्हा पुन्हा हाच विचार करत होते की, त्याला त्या दिवशी बाहेर जाण्याची काय आवश्यकता होती ?

१०. फिरायला निघालेला धर्मेंद्र घरी परतला नाही ! 

एक हिंदु कुटुंब असेही होते, ज्यांचा धर्मेंद्र नावाचा मुलगा दंगलीच्या वेळी हरवला होता. त्याच्या कुटुंबियांच्या मते तो दंगलीच्या दिवशी बाहेर फिरायला गेला होता. सायंकाळी त्यांना समजले की, तेथे दंगल चालू झाली. त्यानंतर ७ दिवसांनीही धर्मेंद्र परत आला नाही.

११. धर्मांधांच्या जमावाने दिलबर नेगीचे हात-पाय कापून त्याचा मृतदेह अग्नीमध्ये फेकणे

दिलबर नेगी हा पौडी (उत्तराखंड) जिल्ह्याच्या थलीसैण तालुक्याचा निवासी होता. तो देहलीत कामासाठी आला होता; परंतु धर्मांधांच्या जमावाने त्याला तो कामाला असलेल्या दुकानात पकडले, त्याचे हात-पाय कापले आणि नंतर त्याचा अर्धवट मृतदेह दुकानाच्या आगीत फेकून दिला. सांगायचे झाले, तर या प्रकरणी देहली पोलिसांनी ७ मासानंतर २ सहस्र ७०० पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले. ज्यात उमर खालिद याच्यासारखे अनेक नावे घेतली होती. त्याच्या कुकृत्यांवर कोणती सुनावणी झाली, हा वादाचा विषय आहे. स्थानिक हिंदू आजही त्यांच्या भागात भीतीपोटी रहात आहेत.

१२. पीडित हिंदूंची ३ वर्षांनंतरची स्थिती 

अ. दंगलीच्या घटनेचा पाठपुरावा घेत असतांना समजले की, कुणाला न्याय मिळाला नाही, तर कुणी अद्यापही हानीभरपाईच्या प्रतीक्षेत आहे. कुणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिली, तर कुणी घर चालवण्यासाठी नोकरी मागत आहे.

आ. यावर्षीही पीडितांच्या नातेवाइकांच्या कुटुंबियांशी चर्चा करत असतांना कळले की, दिवसेंदिवस कशा प्रकारे न्यायालयातून आरोपी सुटत आहेत आणि पीडित कुटुंबांना न्यायही मिळू शकलेला नाही. देहली दंगल प्रकरणी ज्याला पहिली शिक्षा मिळाली, तो दिनेश यादव आहे. त्याच्या दु:खवेगात त्याचे आईवडील दोन्हीही हे जग सोडून गेले आहेत; परंतु तो मुखाग्नी देऊ शकेल, एवढीही त्याला सवलत मिळाली नाही.

इ. मृत पोलीस हवालदार रतन लाल यांच्या पत्नीला प्रारंभी प्रत्येकाने आश्वासने दिली होती; पण आता ती देहली सोडून गेली आहे. तिच्या मते नोकरीसाठी ती देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना विनंती करत राहिली; पण त्यांच्याकडून कोणतेही साहाय्य मिळाले नाही. आता जे पैसे मिळाले आहेत, ते देहलीत राहून पूर्ण व्यय होऊ नये; म्हणून ती माहेरी निघून गेली आहे.

ई. अशाच प्रकारे विनोद नावाच्या मृतकाचीही गोष्ट आहे. धर्मांधांच्या जिहादी जमावाने विनोदला शस्त्रांनी रस्त्यावर मारले. ३ वर्षांनी आता त्याच्या कुटुंबियांशी संपर्क केला, तेव्हा त्यांनी एवढेच सांगितले की, त्यांना फार दु:ख होत आहे की, मुख्य आरोपी हळूहळू सुटत आहेत आणि त्यांची सुनावणीही होत नाही.

(साभार : ‘ऑप इंडिया’चे संकेतस्थळ, २५.२.२०२३)