दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीनृसिंहाच्या चित्राकडे पाहिल्यावर साधिकेला ते रूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच असल्याचे जाणवणे !

योगिता घाटे

‘१५.१०.२०२१ या दिवशी विजयादशमीच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘विजयादशमी विशेषांक’ प्रसिद्ध झाला. त्या अंकावरील पृष्ठ ७ वर ‘भगवंताची तारक आणि मारक अशी दोन रूपे असून भगवंताच्या मारक रूपाला सामोरे जाण्यासाठी केवळ ‘शरणागती आणि प्रार्थना’ हा एकच उपाय असणे’, या लेखांतर्गत ‘श्रीनृसिंह आणि भक्त प्रल्हाद’ ही गोष्ट प्रसिद्ध झाली होती. ती वाचतांना ‘सर्व घटना प्रत्यक्षात घडत आहेत’, असे मला वाटले. मी त्यातील श्रीनृसिंहाच्या चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर मला ‘त्या ठिकाणी परात्पर गुरु डॉक्टरच आहेत’, असे जाणवले. ‘परात्पर गुरु डॉक्टर अतिशय कृपाळू आणि प्रेमळ नजरेने माझ्याकडे पहात आहेत. श्रीनृसिंहाचे महारौद्ररूप असले, तरी त्याच्या नेत्रांमध्ये अतिशय प्रेम आहे’, असे वाटून ‘ते प्रेमळ नेत्रही परात्पर गुरु डॉक्टरांचेच आहेत’, असे मला वाटत होते. त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली श्रीनृसिंहाच्या मुखावरील स्मित हास्यही परात्पर गुरु डॉक्टरांचेच असल्याचे मला वाटत होते. तेव्हा ‘तेथे भगवान श्रीनृसिंह नसून परात्पर गुरु डॉक्टरच आहेत’, असे मला वारंवार जाणवले. आताही जेव्हा मी ते चित्र पहाते, तेव्हा ‘ते परात्पर गुरु डॉक्टरच आहेत’, असेच मला वाटते.’

– योगिता घाटे, फोंडा, गोवा. (२५.१०.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक