पेण (जिल्हा रायगड), ३१ मार्च (वार्ता.) – येथील सायमळ येथे असणार्या महालमिर्या डोंगरावरील रत्नदुर्गावरील शिवमंदिर आणि कालभैरव मंदिर यांचा जीर्णोद्धार अन् दुर्गार्पण सोहळा सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, पेण विभाग यांच्या वतीने दीड सहस्रांहून अधिक शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. दुर्गावर मंदिरातील शिवलिंगाला अभिषेक करण्यात आला, तसेच भगव्या झेंड्याचे ध्वजारोहण भंडारा उधळून करण्यात आले. रत्नदुर्गावरील पाण्याचे कुंड स्वच्छ करण्यात आले होते. या वेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, माजी आमदार धैर्यशील पाटील, स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने मंगेश दळवी, हिंदु जनजागृती समितीचे मनीष माळी, शाहीर वैभव घरत, सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.