भारतात कोरोना संक्रमणाची गती दुप्पट !

सलग दुसर्‍या दिवशी ३ सहस्त्र नवे रुग्ण !

नवी देहली – देशात कोरोना संक्रमणाची गती दुप्पट झाली आहे. ३० मार्चला म्हणजे सलग दुसर्‍या दिवशी देशभरात ३ सहस्र ९५ नागरिक कोरोनाने संक्रमित झालेले आढळले. या दिवशी ५ लोकांचा मृत्यू झाला आणि १ सहस्र ३९६ लोक बरे झाले. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये केरळ राज्यातील ३, तर गुजरात आणि गोवा राज्यांतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. सध्या देशभरात १५ सहस्र २०८ नागरिक कोरोनाग्रस्त आहेत.

६ मासांत प्रथमच एका दिवसात कोरोना संक्रमणाची ३ सहस्र प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या आठवड्यात कोरोना संक्रमणाची प्रतिदिनची सरासरी १ सहस्र ५०० होती.
याआधी २ ऑक्टोबर २०२२ या दिवशी कोरोना संक्रमणाची ३ सहस्र ३७५ प्रकरणे समोर आली होती.