ब्रिटनमधील हिंदू सर्वाधिक निरोगी आणि सुशिक्षित !

जनगणनेतून समोर आली माहिती !

ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या ऑनलाईन जनगणनेमध्ये हिंदु धर्मीय सर्वांत निरोगी आणि सुशिक्षित !

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये मार्च २०२१ मध्ये करण्यात आलेल्या ऑनलाईन जनगणनेमध्ये हिंदु धर्मीय सर्वांत निरोगी आणि सुशिक्षित धार्मिक समूहांपैकी एक आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या जनगणनेमध्ये ८७.८ टक्के हिंदु धर्मियांनी ‘अतिशय उत्तम’ किंवा ‘उत्तम’ आरोग्य असल्याचे नमूद केले. राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण ८२ टक्के इतके आहे. त्यासह हिंदूंमध्ये शारीरिक अपंगत्व असल्याचे प्रमाणही सर्वांत अल्प नोंदवण्यात आले आहे. देशाच्या लोकसंख्येमधील विविध समूहांसंबंधी माहिती प्रसिद्ध करण्यासाठी जनगणनेच्या आकडेवारीचे विश्‍लेषण केले जात आहे. या जनगणनेत विचारण्यात आलेले धार्मिक प्रश्‍न ऐच्छिक असतात. वर्ष २०२१ मध्ये झालेल्या जनगणनेत ब्रिटनमधील ९४ टक्के नागरिकांनी या प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत.

१. ब्रिटनमधील हिंदूंमध्ये शिक्षणाचे प्रमाणही राष्ट्रीय लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. ब्रिटनमध्ये शिक्षणाची सर्वोच्च पातळी ही ‘स्तर ८’ इतकी आहे. ‘स्तर ४’ आणि त्यापेक्षा वरील पातळीचे शिक्षण (प्रमाणपत्र स्तर) घेणार्‍या हिंदूंचे प्रमाण ५४.८ टक्के इतके आहे. राष्ट्रीय पातळीवर हेच प्रमाण ३३.८ टक्के इतके आहे.

२. ब्रिटनमधील शीख समुदायाची गणना सधन गटामध्ये होत असल्याचे या जनगणनेमध्ये दिसून येत आहे. स्वत:चे घर असण्याची शक्यता असलेल्यांमध्ये शीख धर्मीय आघाडीवर आहेत.

संपादकीय भूमिका

ब्रिटनमधील हिंदु समाज सर्वाधिक सुशिक्षित असून देशाच्या उत्कर्षासाठीही तेथील हिंदूंचे योगदानही उल्लेखनीय आहे. असे असतांनाही ब्रिटनमधील हिंदूंवर तेथील धर्मांध मुसलमान आक्रमण करून त्यांचा छळ करतात आणि तेथील सरकार, पोलीस आणि प्रशासन बघ्याची भूमिका घेते, हे संतापजनक होय !