पाकने जम्मू-काश्मीर स्वतःच्या मानचित्रात दाखवल्याने भारताने पाकला बैठकीतून बाहेर काढले !  

नवी देहली येथे शांघाय महामंडळाच्या बैठकीतील घटना !

नवी देहली – पाकिस्तानने भारताचे चुकीचे मानचित्र (नकाशा) दाखवल्यावरून भारताने शांघाय महामंडळाच्या बैठकीतून पाकिस्तानला बाहेर जाण्यास सांगितले. या महामंडळाचे यजमानपद भारताकडे आहे. या महामंडळाच्या विद्यमाने ‘इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनालिसिस’ या संस्थेने ही बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळही उपस्थित होते. या बैठकीच्या वेळी पाकिस्तानच्या मानचित्रामध्ये जम्मू-काश्मीरचा भाग दाखवण्यात आला होता. त्यावर भारताने आक्षेप घेऊन, ‘जर या बैठकीत सहभागी व्हायचे असेल, तर योग्य मानचित्र दाखवा अन्यथा बैठकीतून बाहेर पडा’, असे सुनावले. त्यानंतर पाकिस्तान या बैठकीतून बाहेर पडला.

संपादकीय भूमिका

भारतात बैठकीला येतांनाही अशा प्रकारचे धाडस करणार्‍या पाकला केवळ बैठकीतून नाही, तर या महामंडळाच्या सदस्यपदावरूनही हाकलले पाहिजे !