देवाची झोपमोड होते; म्हणून जगन्नाथ मंदिरातील उंदरांना पळवणारे यंत्र हटवले !

पुरी (ओडिशा) – येथील जगन्नाथ मंदिरातील गाभार्‍यामध्ये उंदरांचा सुळसुळाट झाल्याने त्यांना पळवून लावण्यासाठी ‘अर्थ इनोवेशन’ हे यंत्र बसवण्यात आले होते; मात्र, या यंत्राच्या आवाजामुळे जगन्नाथ देवाची झोपमोड होत असल्याच्या तक्रारी पुजार्‍यांनी केल्याने मंदिर प्रशासनाने हे यंत्र हटवले आहे.