नवी देहली – दोषी व्यक्तीला मृत्यूदंड म्हणून फासावर लटकवण्याऐवजी दुसरी शिक्षा देता येऊ शकते का ? याचा केंद्रशासनाने विचार करावा, तसेच तज्ञांची समिती नेमून अल्प वेदनेचा दुसरा पर्याय सुचवावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. फासावर लटकवल्यानंतर दोषी व्यक्ती मृत्यू व्हायला किती वेळ लागतो ? फाशीमुळे किती वेदना होतात ? यांविषयी मोठ्या रुग्णालयांतील तज्ञांकडून शास्त्रीय माहिती गोळा करून ती न्यायालयापुढे सादर करा, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
याचिकाकर्ता ने फांसी की जगह ऐसे तरीके से मौत की सजा देने की अपील की है, जो अमानवीय न हो और जिसमें दर्द कम होता हो#SupremeCourt (@sanjoomewati, @AneeshaMathur)https://t.co/rM89ZMw6mz
— AajTak (@aajtak) March 21, 2023
‘सध्याची फाशी देण्याची पद्धत अत्यंत अमानुष आहे. दोषीला फासावर लटकवल्यामुळे प्रचंड वेदना होऊन त्याचा मृत्यू होतो. त्याऐवजी गोळीबार, प्राणघातक इंजेक्शन किंवा विजेचा शॉक देऊन मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी’, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. यावर सुनावणी करतांना न्यायालयाने वरील आदेश दिला. याप्रकरणी २ मे दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.