फौजदारी खटले रहित करण्याची सायरो-मलबार चर्चच्या प्रमुखांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

भूमी घोटाळा प्रकरण

आर्चबिशप कार्डिनल जॉर्ज अ‍ॅलेन्चेरी (डावीकडे)

नवी देहली – केरळमधील एर्नाकुलम-अगमाली आर्कडायोसीसच्या भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी स्वतःच्या विरोधातील फौजदारी खटले रहित करण्याची मागणी करणारी सायरो-मलबार चर्चचे प्रमुख आर्चबिशप कार्डिनल जॉर्ज अ‍ॅलेन्चेरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली. या प्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये दिलेल्या निकालाच्या विरोधात कार्डिनल जॉर्ज अ‍ॅलेन्चेरी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका प्रविष्ट केली होती.

न्यायमूर्ती दिनेश माहेश्‍वरी आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपिठाने या प्रकरणी निकाल राखून ठेवल्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणी पुढील निर्देश दिले होते; मात्र त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते.