पशूवैद्यकीय डॉ. युसुफ खान हाच हत्याकांडाचा सूत्रधार !  – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

उमेश कोल्हे हत्या प्रकरण

हत्या करण्यात आलेलं औषध व्यावसायिक उमेश कोल्हे (डावीकडे) आरोपी युसुफ खान (उजवीकडे)

मुंबई – अमरावती येथील औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला पशूवैद्यकीय डॉ. युसुफ खान हाच या हत्याकांडाचा सूत्रधार आहे, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) विशेष न्यायालयात सांगितले. डॉ. युसूफ खान याच्या अधिवक्त्याने जामिनासाठी विशेष एन्.आय.ए. न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या जामिनाला विरोध करतांना यंत्रणेने वरील माहिती न्यायालयाला दिली.


‘डॉ. युसूफ हा तबलिगी जमातीचा सदस्य नव्हता’, तसेच ‘त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत’, असा दावा युसुफच्या अधिवक्त्यांनी केला, तर युसुफ यानेच उमेश कोल्हे यांच्या संदेशांचे ‘स्क्रीननशॉट’ (छायाचित्र) काढून भाजपच्या नेत्या नूपुर शर्मा यांना लक्ष्य करण्यासाठी तरुणांना भडकावले’, असे यंत्रणेने न्यायालयात सांगितले. प्रेषित पैगंबर यांच्या अपमानाचा सूड घेण्याचा प्रयत्न आरोपी करत होते, असेही अन्वेषण यंत्रणेचे म्हणणे आहे.

आता या जामीन याचिकेवर २४ मार्चला सुनावणी होणार आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे या प्रकरणाचे अन्वेषण सोपवण्यात आल्यानंतर ११ जणांना अटक करण्यात आली असून २ आरोपी अद्यापही फरार आहेत.