व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथील चर्चवर इस्लामी कट्टरतावाद्यांच्या आक्रमणांचा धोका !


व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) –
युरोपमधील ऑस्ट्रिया देशाची राजधानी व्हिएन्नामध्ये इस्लामी कट्टरतावाद्यांकडून चर्चवर आक्रमणे होऊ शकतात, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिली आहे.

याविषयी व्हिएन्ना पोलिसांनी ट्वीट करून सांगितले की, चर्चवर आक्रमणाचा धोका आहे. या पार्श्भूमीवर चर्चसह काही इमारतींची सुरक्षा अधिक कडेकोट करण्यात आली आहे. राजधानीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.  जर एखाद्या ठराविक ठिकाणी धोका असल्याची माहिती मिळाली, तर त्वरित त्याविषयी सजग केले जाईल.

संपादकीय भूमिका

संपूर्ण जगच जिहादी आतंकवाद्यांच्या सावटाखाली आहे ! त्यामुळे संबंधित सर्व देशांनी एकत्र येऊन याविरोधात लढा दिला पाहिजे !