भारत भेटीवर आलेल्या जपानी पर्यटकाने स्वीकारला हिंदु धर्म !

छतरपूर (मध्यप्रदेश) – भारत भेटीवर आलेला केंजी सिमी या जपानी पर्यटकाने रामकृष्ण आश्रम पाहून प्रभावित होऊन हिंदु धर्म स्वीकारला. त्यांचे जपानी नाव पालटून सुमित असे ठेवण्यात आले आहे. पूजा-अर्चा करणे, हा आता त्यांचा नित्यक्रम बनला आहे. ते आता स्पष्ट उच्चारांत गायत्री मंत्राचा जप करतात.

सुमित यांचा खजुराहो येथील रहिवासी असलेला भारतीय मित्र अविनाश तिवारी यांनी सांगितले की, त्यांची देहलीत भेट झाली होती. तेव्हा त्यांचे हिंदु धर्मावरील प्रेम आणि श्रद्धा दिसून आली. त्यामुळे त्यांच्याशी मैत्रीही झाली. सुमित यांनी ‘मी वाराणसीला जाऊन अभिषेकही केला आहे’, असे सांगितले. ते ‘ॐ नम: शिवाय’ आणि ‘जय श्रीराम’ जप करतात. सुमित यांनी खजुराहो येथे पोचल्यानंतर श्री हनुमान मंदिरात पूजा-अर्चा केली.

संपादकीय भूमिका

हिंदु धर्मावर सतत टीका करणार्‍यांना सणसणीत चपराक !