हिंदूंच्‍या रक्षणासाठी भारताला‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणून घोषित करा ! – मोहन गौडा, प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने चेन्‍नम्‍माकेरे अच्‍चुकट्टू (बेंगळुरू) येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा

श्री. मोहन गौडा

बेंगळुरू (कर्नाटक) – होळीच्‍या काळात देशभरात हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. अशाच प्रकारची आक्रमणे महाशिवरात्रीच्‍या वेळीही झाली. एवढेच नव्‍हे, तर आज प्रत्‍येक सणाच्‍या वेळी हिंदूंवर आक्रमण होत आहेत. हिंदू बहुसंख्‍यांक असलेल्‍या भारतात हिंदू आज सुरक्षित आहेत का ? याचे उत्तर ‘नाही’, असे असून हिंदूंच्‍या रक्षणसाठी भारताला ‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणून घोषित करणे आवश्‍यकत आहे, असे उद़्‍गार हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्‍य प्रवक्‍ते श्री. मोहन गौडा यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीने चेन्‍नम्‍माकेरे अच्‍चुकट्टू येथे आयोजित केलेल्‍या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेला ते संबोधित करत होते. या सभेमध्‍ये भाजपचे विधान परिषदेचे माजी सदस्‍य डॉ. एस्.आर्. लीला आणि सनातन संस्‍थेच्‍या सौ. देवकी यांनी भाषण केले.