देहलीच्या आमदारांच्या वेतनात ६७ टक्के, तर मुख्यमंत्र्यांच्या वेतनात १३६ टक्क्यांची वाढ !

देहली – देहली विधानसभेतील आमदारांच्या वेतनात १२ वर्षांनंतर ६७ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यांना पूर्वी प्रतिमास ५४ सहस्र रुपये वेतन मिळत होते, आता ९० सहस्र रुपये मिळणार आहेत. यासह मुख्यमंत्री, मंत्री, सभापती, उपसभापती यांचे वेतन आणि भत्ते यांत १३६ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यांना प्रतिमास ७२ सहस्र रुपये मिळत होते, आता १ लाख ७० सहस्र रुपये मिळणार आहेत.

संपादकीय भूमिका

  • अशी वाढ सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनात कधी होते का ?
  • इतकी वाढ झाल्यानंतरही हे आमदार किती काम करतात ? त्यांच्या कामाचा जनतेला, देशाला किती लाभ झाला, याचा आढावा कोण घेणार ? सर्वसामान्य कर्मचार्‍यांनी काम केले नाही, तर त्यांना जाब विचारला जातो, तसे यांना कोण जाब विचारतो का ?