नवी देहली – अलाहाबाद उच्च न्यायालयाने न्यायालय परिसरात असलेली मशीद वर्ष २०१७ मध्ये हटवण्याचा आदेश दिला होता. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवत मशीद हटवण्याची आणि त्यास पर्यायी भूमी देण्यासाठी राज्यशासनाकडे मागणी करण्याची अनुमती वक्फ बोर्डाला दिली आहे. ‘३ मासांच्या आत मशीद हटवावी अन्यथा ती हटवण्यात येईल’, असेही न्यायालयाने वक्फ बोर्डाला सांगितले आहे. सदर मशीद वर्ष १९५० पासून या ठिकाणी असून न्यायालयाचा विस्तार करतांना ती हटवत असतांना वक्फ बोर्डाकडून विरोध करण्यात आला होता. ही मशीद ‘मशीद हायकोर्ट’ या नावाने ओळखली जाते.
#इलाहाबाद हाई कोर्ट #परिसर से हटेगी #मस्जिद, इतने दिनों में #हटाने का आदेशhttps://t.co/9u6JXEFky0#Allahabad #HighCourt #SupremeCourt #mosque #NewsUpdate
— Hindusthan Post (@HindusthanPostH) March 13, 2023