संगमेश्‍वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी शासनाकडून १० कोटी रुपये संमत

रत्नागिरी – जेथे छत्रपती संभाजी महाराज यांना क्रूरकर्मा औरंगजेबाने बंदी केले, त्या कसबा (संगमेश्‍वर) परिसरात संभाजी महाराजांचे स्मारक आणि वस्तूसंग्रहालय उभारण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० कोटी रुपयांचा निधी संमत केला. ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षण दिन समिती’च्या वतीने झालेल्या ‘धर्मरक्षण दिना’च्या कार्यक्रमात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शासनाच्या वतीने ही घोषणा केली. या वेळी व्यासपिठावर माजी खासदार नीलेश राणे, आमदार शेखर निकम, माजी आमादार राजन तेली आणि आयोजक प्रमोद जठार उपस्थित होते.

आमदार प्रसाद लाड पुढे म्हणाले,

१. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘कसबा परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक झाले पाहिजे’, अशी येथील लोकांची मागणी आहे, असे सांगितले. तेव्हा उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तात्काळ चर्चा करून यासाठी १० कोटी रुपये संमत केले.

२. माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली २५ मार्चपर्यंत येथील जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन स्मारकासाठी जागा निश्‍चित करून, तसा प्रस्ताव शासनाला सादर करायचा आहे.

३. एकीकडे महाराजांचे स्मारक आपण उभे करणारच आहोत; पण ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हाल हाल करून त्यांना मारले, त्या औरंगजेबाचे  थडगे जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज नगरातून उचकटून टाकत नाही, तोपर्यंत महाराजांचे बलीदान सार्थकी लागणार नाही. त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ आणि सहभाग हवा आहे.