पंजाबमधील ‘जी-२०’ची संमेलने रहित करण्याची शक्यता !

खलिस्तानवाद्यांच्या कारवायांचा परिणाम !

अमृतसर (पंजाब) – पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांत खलिस्तानवाद्यांकडून करण्यात आलेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर १५ ते १७ मार्च आणि १९ अन् २० मार्च या काळात आयोजित करण्यात आलेली जी-२० संमेलने रहित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार ही संमेलने रहित करण्यात आली आहेत; मात्र त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

१. अमृतसर येथील काही उपाहारगृहांना दूरभाष करून ही संमेलने रहित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. या संदर्भात काँग्रेसचे खासदार गुरजीत औजला आणि आमदार सुखपालसिंह खेहरा यांनी ट्वीट करून ही संमेलने रहित झाल्याची शंका उपस्थित केली आहे. याविषयी राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

२. संमेलने रहित करण्यामागे सुरक्षा यंत्रणांच्या सल्ल्याचा आधार घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. खलिस्तानवाद्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे सुरक्षा यंत्रणांनी संमेलने रहित करण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे.

संपादकीय भूमिका 

जर असे घडले, तर ते भारतासाठी लज्जास्पद असेल ! भारत खलिस्तानवाद्यांकडे गांभीर्याने कधी पहाणार ? असा प्रश्‍न निर्माण होतो !