पाकने लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले असते, तर आजच्या सारखी स्थिती आली नसती !

पाकच्या माजी अर्थमंत्र्यांनी टोचले कान !

पाकिस्तानची वाढती लोकसंख्या

कराची (पाकिस्तान) – इस्लामी देशांनी ज्या प्रमाणे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले, तसे पाकिस्तानने न ठेवल्याने आज देशाची स्थिती वाईट झाली आहे, असे विधान पाकचे माजी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी केले. कराची येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आर्थिक आव्हाने दूर करण्यासाठी आपल्याला लोकसंख्येच्या नियंत्रणावर जोर दिला पाहिजे’, असे आवाहन त्यांनी केले.

पाकचे माजी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल

मिफ्ताह इस्माइल म्हणाले की,

१. पाकिस्तानमध्ये प्रत्येक वर्षी ५५ लाख मुले जन्माला येतात. जर इतकी मुले जन्माला येत असतील, तर पाकिस्तानमध्ये लोकसंख्या नियोजनावर केव्हा लक्ष देणार ? जेव्हा या विषयावर चर्चा केली जाते, तेव्हा एक विशेष गट यावर टीका करण्यासाठी पुढे येतो. इजिप्त, बांगलादेश, ट्यूनीशिया या मुसलमान देशांनी लोकसंख्येचे नियोजन केले; पण आपण केले नाही. जर गेल्या १० वर्षांमध्ये बांगलादेशातील प्रजननाच्या प्रमाणात आपले प्रजनन असते, तर आज पाकचे सकल राष्ट्रीय उत्पन्न प्रतीव्यक्ती १५ टक्क्यांहून अधिक असते.

२. पाकच्या निर्मितीच्या पहिल्या ११ वर्षांत ७ पंतप्रधान झाले, तर त्याच काळात भारताने ५ आयआयटीची स्थापना केली. पाकिस्तान मागील कर्ज चुकवण्यासाठी आणखी कर्ज घेतो. ही पद्धत कधीही यशस्वी होणार नाही.

_____________________________________ 

संपादकीय भूमिका

  • पाकची ज्याप्रमाणे स्थिती झाली आहे, तशी भविष्यात भारतातही लोकसंख्येवर नियंत्रण न ठेवल्याने येऊ शकते, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
  • भारतातील लोकसंख्या कोण वाढवत आहे, हे जगजाहीर आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, अन्यथा भारताचाही ‘पाक’ झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !