अनंत करमुसे मारहाण प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाचे पुन्हा अन्वेषण करण्याचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड

ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याशी संबंधित अनंत करमुसे यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. या प्रकरणी राज्य शासनाच्या तपास यंत्रणांना पुन्हा अन्वेषण करण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचा अहवाल पुढील ३ मासांत सादर करण्यास न्यायालयाने अन्वेषण यंत्रणांना सांगितले आहे.

अनंत करमुसे यांनी पुन्हा अन्वेषण करण्याची मागणी न्यायालयाला केली होती. मागील सरकारने या प्रकरणी चुकीचे अन्वेषण केल्याचे करमुसे यांचे म्हणणे आहे. ‘आघाडी सरकारने केलेल्या चुका शिंदे-फडणवीस सरकार सुधारेल आणि मला न्याय मिळेल’, असे करमुसे यांनी म्हटले आहे.

करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड यांना जामीन संमत करण्यात आलेला आहे. मारहाणीच्या वेळी आव्हाड उपस्थित होते, असे करमुसे यांनी तक्रारीत म्हटले होते.