पूजेतील निर्माल्‍याचे महत्त्व आणि त्‍यांतील चैतन्‍य टिकण्‍याचा कालावधी 

वर्ष २००२ मध्‍ये प.पू. डॉ. आठवले यांच्‍या चरणांवर वाहिलेली आणि पू. फडकेआजींनी जपून ठेवलेली फुले (फुले अजूनही टवटवीत दिसत आहेत.)

‘पूजेत देवतेला वाहिलेल्‍या फुलामध्‍ये देवतेचे चित्र किंवा प्रतिमा यांतून प्रक्षेपित होणारे चैतन्‍य आकृष्‍ट होत असते. त्‍यामुळे उत्तरपूजेनंतर देवतेला वाहिलेले फूल पूजकाने हुंगून नंतर बाजूला ठेवण्‍यासंदर्भात धर्मशास्‍त्रात सांगितले आहे. असे केल्‍याने पूजकाला निर्माल्‍यातील चैतन्‍य त्‍याच्‍या गंधाद्वारे ग्रहण करता येते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पूजन केल्‍यामुळे देवाला वाहिलेल्‍या फुलांचे निर्माल्‍यात रूपांतर झाल्‍यावरही त्‍यामध्‍ये आकृष्‍ट झालेले सगुण चैतन्‍याचे प्रमाण आणि ते चैतन्‍य टिकून रहाण्‍याचा कालावधी पूजेनंतर हळूहळू फुले कोमेजतात. असे असतांना सारणीत पाचव्‍या दिवसापर्यंत निर्माल्‍यात आकृष्‍ट होणार्‍या सगुण चैतन्‍याचे प्रमाण वाढत कसे गेले ?

हे प्रमाण सनातनच्‍या रामनाथी आश्रमात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्‍या भावपूर्ण पूजेमुळे निर्माल्‍यात आकृष्‍ट झालेल्‍या सगुण चैतन्‍याचे प्रमाण वाढत गेले. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍यातील निस्‍सीम भक्‍तीभावामुळे पूजेच्‍या निर्माल्‍यातील चैतन्‍य ५ दिवसांपर्यंत टिकून राहिले’, असे जाणवते. सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीने केलेल्‍या पूजेमुळे त्‍यातील निर्माल्‍यातील सगुण चैतन्‍य न्‍यून होत जाते.

पू. विमल फडकेआजी

२. निर्माल्‍यात निर्गुण चैतन्‍य आकृष्‍ट झाल्‍याने निर्माल्‍य दीर्घकाळ टवटवीत रहाणे

निर्माल्‍यात अधिकाधिक ३० टक्‍के इतके सगुण चैतन्‍य आकृष्‍ट होत असते आणि त्‍याचा परिणाम पूजेनंतर अधिकाधिक पाच दिवस टिकून रहातो. काही वेळा पूजेत देवतेला वाहिलेले किंवा एखाद्या संतांना अर्पण केलेले फूल किंवा फुलांचा हार यांमध्‍ये निर्गुण चैतन्‍यही आकृष्‍ट होते. तेव्‍हा फुलांतील चैतन्‍य पाच दिवसांपेक्षा अधिक काळ टिकून रहाते. उदा. वर्ष २००२ मध्‍ये प.पू. डॉक्‍टर आठवले यांच्‍या चरणांवर वाहिलेली फुले पू. फडकेआजींनी तेव्‍हापासून जपून ठेवली होती. ती अजूनही टवटवीत आहेत; कारण त्‍यांच्‍यातील भावामुळे त्‍या फुलांमध्‍ये श्रीविष्‍णूचे निर्गुण चैतन्‍य कार्यरत झाले आहे.

३. निर्माल्‍याचा उपयोग आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपायांसाठी करावयाचा कालावधी

कु. मधुरा भिकाजी भोसले

निर्माल्‍यात चैतन्‍य टिकून असल्‍याचे सर्वोत्तम लक्षण म्‍हणजे निर्माल्‍य टवटवीत असणे (निर्माल्‍य न कोमेजणे). त्‍यामुळे जोपर्यंत एखादे निर्माल्‍य (फूल किंवा हार) टवटवीत आहे, तोपर्यंत त्‍याच्‍यात चैतन्‍य टिकून असल्‍याने त्‍या निर्माल्‍याचा उपयोग आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करण्‍यासाठी करू शकतो. सर्वसामान्‍य व्‍यक्‍तीने पूजन केलेल्‍या पूजेतील फुले फारतर १ दिवस टवटवीत राहिल्‍याने त्‍यांच्‍या पूजेतील निर्माल्‍याचा आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपायांसाठी केवळ १ दिवसापुरता उपयोग करता येतो. संत किंवा सद़्‍गुरु यांनी पूजन केलेल्‍या निर्माल्‍यातील चैतन्‍य अधिक काळ टिकून राहिल्‍यामुळे त्‍याचा उपयोग १ ते ५ दिवसांपर्यंत जोपर्यंत ते निर्माल्‍य टवटवीत आहे तोपर्यंत करू शकतो.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आताची आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.२.२०२० रात्री १०.४०)

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.