चित्रकला आणि संगीतकला यांतील भेद

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संगीताविषयी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. चित्रकला

‘एखादे चित्र अनेकदा पाहिले, तरी ते तसेच दिसते. त्‍याचा आपल्‍या मनावर होणारा परिणाम तसाच होतो. चित्रातील रंग आणि आकार पालटून मर्यादित निराळ्‍या तर्‍हेच्‍या अनुभूती येतात.

२. संगीतकला

एखादे गाणे निरनिराळ्‍या तर्‍हेने गाता येते किंवा वाजवता येते. त्‍यामुळे त्‍याच्‍या अनुभूती निरनिराळ्‍या येतात आणि त्‍यांचा परिणामही निरनिराळा होतो. गातांना भाव असला, तर त्‍याचा परिणाम आणखीन निराळा होतो. त्‍यामुळे संगीतातून निरनिराळ्‍या अनेक तर्‍हेच्‍या अनुभूती येतात.

३. चित्रकला आणि संगीतकला यांतून येणारे अनुभूतींचे शास्‍त्र

चित्रकला तेजतत्त्वाशी संबंधित आहे, तर संगीतकला आकाशतत्त्वाशी संबंधित आहे. तेजतत्त्वामुळे आकाशतत्त्वापेक्षा मर्यादित अनुभूती येतात.’

– (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले (२१.९.२०२०)


संगीताने सर्वाधिक उपाय होण्‍याचे कारण

‘नेहमीची औषधे अधिक करून पृथ्‍वीतत्त्वाशी संबंधित असतात, तर संगीत पंचमहाभूतांतील सर्वांत सूक्ष्म असलेल्‍या आकाशतत्त्वाशी संबंधित असल्‍याने त्‍याची परिणामकारकता सर्वाधिक असते.’

– (परात्‍पर गुरु) डॉ. आठवले (१.८.२०१८)