सतत दुसर्‍यांच्या आनंदाचाच विचार करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ‘जीवनचरित्र’ म्हणजे, केवळ साधकांसाठीच नव्हे, तर अखिल मानवांच्या उद्धारासाठी असलेला अनमोल ठेवा ! ‘घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चरित्र सर्व समाजापर्यंत लवकरात लवकर पोचावे’, या उद्देशाने आम्ही साधक त्यांच्या चरित्रग्रंथाची सेवा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अधिकाधिक लवकर करायचा प्रयत्न करत आहोत.

पू. संदीप आळशी

ही पार्श्वभूमी असतांना एकदा एका ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ लेखकांनी त्यांचे काही ऐतिहासिक/पौराणिक ग्रंथ प्रसिद्ध करण्यासाठी साहाय्य करण्याची विनंती सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना केली. त्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी त्यांना होकार दिला. यासंदर्भात नंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर म्हणाले, ‘‘माझे चरित्रग्रंथ एकवेळ लवकर प्रसिद्ध झाले नाहीत, तरी चालेल; पण त्या हिंदुत्वनिष्ठ लेखकांचे ग्रंथ प्रसिद्ध झाले, तर त्यांना आनंद वाटेल.’’ सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर प्रत्येकालाच आनंद मिळावा, यासाठी केवढा विचार करतात ! ‘इतरांना आनंद वाटेल, अशा कृती आपल्याकडूनही होतात ना ?’, याचा साधकांनीही अंतर्मुख होऊन विचार करावा.’

– (पू.) संदीप आळशी (३.२.२०२३)