‘सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. प्रसिद्ध झालेल्या त्या छायाचित्रांकडे पाहून साधकांना ‘नामजप चालू होणे, भाव जागृत होणे, चैतन्य जाणवणे, प्रकाश जाणवणे, थंडावा जाणवणे, मन निर्विचार होणे, शांत वाटणे’, यांच्यापैकी काही अनुभूती आल्यास त्यांनी ‘सनातन प्रभात’चा तो अंक स्वतःकडे संग्रही ठेवावा. साधकांनी अनुभूती आलेल्या त्या छायाचित्राकडे बघून नामजप करावा. अशा प्रकारे साधकांनी ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या छायाचित्रांचा आध्यात्मिक स्तरावरील लाभ करून घ्यावा.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (५.२.२०२३)