उत्तराखंडमध्‍ये अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करणार्‍या मदरसा शिक्षकाला २० वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा !

डेहराडून (उत्तराखंड) – येथील पॉक्‍सो कायद्याच्‍या विशेष न्‍यायालयाने १४ वर्षांच्‍या मुलीवर बलात्‍कार केल्‍याच्‍या प्रकरणी मदरशाचा शिक्षक झिशान (वय ३० वर्षे) याला २० वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच ५० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला. यांतील ४० सहस्र रुपये पीडित मुलीला देण्‍यास सांगितले आहे. १९ मार्च २०२२ या दिवशी बलात्‍काराची घटना घडली होती.

संपादकीय भूमिका 

मदरशांमध्‍ये काय चालते, हे आतापर्यंत अशा घटनांतून लक्षात आले असल्‍याने त्‍यांवर बंदी घालणेच योग्‍य !