गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्‍या अहमद मुर्तजा याला फाशीची शिक्षा !

गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणारा अहमद मुर्तजा

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाच्या न्यायालयाने आरोपी अहमद मुर्तजा याला दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा ठोठावली. ४ एप्रिल २०२२ या दिवशी मुर्तजा याने मंदिराबाहेरील सुरक्षारक्षकांवर ‘अल्लाहू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’च्या) घोषणा देत धारदार शस्त्राद्वारे आक्रमण करून त्यांना घायाळ केले, तसेच त्यांच्याकडून शस्त्र काढून घेण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याला नंतर अटक केली होती. तो स्वतःला मनोरुग्ण अल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न करत होता; मात्र ते सिद्ध होऊ शकले नाही.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर कोणत्याही स्वरूपाच्या आक्रमणासाठी, तसेच अवमानासाठी अशाच प्रकारची शिक्षा झाल्यासच इतरांना धाक बसेल आणि अशा घटना न्यून होतील !