बांगलादेशातील मंदिरातील दागिने चोरणार्‍याने दागिने केले परत !

ढाका (बांगलादेश) – चटगावाच्या धलघाट येथील बुरा काली मंदिरामध्ये एक आठवड्यापूर्वी मंदिरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. आठवड्याभरानंतर चोरट्याने येऊन सर्व दागिने मंदिरासमोर टाकून दिल्याची घटना घडली.