(म्हणे) ‘मुसलमानांचे धर्मांतर करणार्‍या धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर कारवाई करावी !’ – मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी

‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांची सरकारकडे मागणी

(मौलाना म्हणजे इस्लामचे अभ्यासक)

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री (डावीकडे) मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी (उजवीकडे)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी मुसलमानांना धर्मांतरित करण्याचे काम चालू आहे. ते द्वेष पसरवत आहेत. माझी भारत सरकारला विनंती आहे की, त्यांनी धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा करावा आणि इस्लामला अपकीर्त करणार्‍या अशा बाबांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्यांना रोखावे, अशी मागणी ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी केली.

धीरेंद्रशास्त्री यांनी त्यांच्या दरबारामध्ये एका मुसलमान महिलेला हिंदु धर्मांत पुनर्प्रवेश दिला होता. यावरून बरेलवी यांनी छत्तसगड सरकारकडे धीरेंद्रशास्त्री यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. ‘जर एखादा मुसलमान धर्मगुरु कुणाचे धर्मांतर करत असला असता, तर छत्तीसगड सरकारने त्याला २४ घंट्यांत कारागृहात टाकले असते’, असे सांगत ‘जर छत्तीगड सरकारने धीरेंद्रशास्त्री यांच्यावर कारवाई केली नाही, तर आम्ही न्यायालयाचे दार ठोठावू’, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

मौलाना शहाबुद्धीने बरेलवी पुढे म्हणाले की, बागेश्‍वर धामचे संचालक बाबा धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी जी पद्धत अवलंबली आहे, त्यामुळे भारतात द्वेष पसरत आहे. त्यांनी आतापर्यंत ३२८ जणांचे धर्मांतर केले आहे. ते इस्लाच्या विरोधात द्वेष पसरवत आहेत. त्यांनी स्वतः म्हटले आहे, ‘मी टोपीवाल्यांना सनातनधर्मी बनवणार आहे.’ प्रसारमाध्यांसमोर अशा प्रकारची विधाने करणे, हा इस्लामचा अवमान आहे. याविषयी मुसलमानांचा आक्षेप आहे.

संपादकीय भूमिका

  • मुसलमान आक्रमकांनी गेल्या दीड सहस्र वर्षांच्या इतिहासामध्ये तलवारीच्या बळावरच संपूर्ण जगात इस्लामचा प्रसार केला आणि आज जगात ५२ इस्लामी देश आहेत. हिंदूंनी कधीही कुणाचे धर्मांतर केले नाही; मात्र कोट्यवधी हिंदूंचे आतापर्यंत धर्मांतर झाले आहे. हिंदूंचा जगात एकही देश नाही आणि भारतातही ९ राज्यांत हिंदू अल्संख्यांक झाले आहेत. अशा वेळी भारतातील अन्य धर्मांत गेलेले हिंदू परत हिंदु धर्मात स्वच्छेने येत असतील, तर त्याला कोणताही कायदा रोखू शकत नाही !
  • जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदूंना लक्ष्य करून ठार मारले जाते, त्याविषयी कधी मौलाना बरेलवी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

भारत कधीही हिंदु किंवा इस्लामी राष्ट्र बनू शकत नाही !

हिंदु राष्ट्राविषयी बोलतांना मौलाना शहाबुद्दीन बरेलवी म्हणाले की, काही लोक भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याच्या गोष्टी करत आहेत. भारत कायदा आणि राज्यघटना यांनुसार चालणारा देश आहे. येथे रहाणारे नागरिक राज्यघटनेचे पालन करतात. यामुळे हा देश कधीही हिंदु राष्ट्र किंवा इस्लामी राष्ट्र बनू शकत नाही. यामुळे अशी स्वप्ने पहाणे बंद केले पाहिजेत.

संपादकीय भूमिका

हिंदूंनी हिंदु राष्ट्राविषयी बोलणे चालू केल्यावर मौलानांना आता कंठ फुटला आहे. आतापर्यंत जिहादी लोक भारताला ‘इस्लामी देश’ बनवण्याविषयी बोलत होते, तोपर्यंत असे मौलाना गप्प होते, हे लक्षात घ्या !