नोकरीचे आमीष दाखवून विवाहितेवर बलात्‍कार, २ धर्मांध तसेच अन्‍य एकावर गुन्‍हा नोंद !

पुणे – येथे डन्‍झो (Dunzo) या ‘ऑनलाईन डिलिव्‍हरी अ‍ॅप’ आस्‍थापनामध्‍ये नोकरीचे आमीष दाखवत २६ वर्षीय महिलेवर बलात्‍कार केल्‍याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरिफ खान, रवि आणि रियाज यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. आरिफ खानने आपण पतीचा मित्र असल्‍याचे सांगून नोकरीच्‍या आमीषाने पीडितेला लॉजवर नेऊन बलात्‍कार केला. दुसर्‍या आरोपीने तिची छायाचित्रे प्रसिद्ध करण्‍याची धमकी देत १ लाख रुपयांची मागणी केली, तर तिसर्‍या आरोपीने सातत्‍याने धमकावले असल्‍याचे तक्रारीमध्‍ये नमूद केले आहे.

संपादकीय भूमिका 

वासनांध आणि गुन्‍हेगारी वृत्तीच्‍या धर्मांधांना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे !