|
मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपालपदाचे त्यागपत्र देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याविषयीचे पत्र पंतप्रधानांना पाठवले असल्याची माहिती स्वत: राज्यपालांनी २३ जानेवारी या दिवशी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी देना चाहते हैं इस्तीफा, PM मोदी के सामने जताई इच्छा pic.twitter.com/IPq9cXGw2i
— FirstBiharJharkhand (@firstbiharnews) January 23, 2023
पंतप्रधान मोदी मुंबई येथे आले असतांना त्यांच्याशी याविषयी चर्चा झाली. राजकीय दायित्वातून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतन यांमध्ये व्यतित करण्याची इच्छा मी त्यांच्याकडे व्यक्त केली आहे, असे कोश्यारी यांनी पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीर यांच्या महान भूमीचा राज्यसेवक होण्याचा बहुमान मिळणे, हे माझ्यासाठी अहोभाग्य होते. मागील ३ वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. पंतप्रधानांचा विशेष स्नेह मला नेहमीच लाभला आहे, असेही राज्यपालांनी या पत्रात नमूद केले आहे.