‘लव्‍ह जिहाद’ आणि देशाच्‍या सुरक्षिततेचे महत्त्व

लव्‍ह जिहादच्‍या माध्‍यमातून किती देशविरोधी कारवाया केल्‍या जात आहेत, याचा शोध घेऊन त्‍याची पाळेमुळे उखडायला हवीत !

गेले दोन मास देशभरात वृत्तवाहिन्‍यांपासून ते सोशल मिडियापर्यंत चर्चेचा एकमेव विषय होता तो श्रद्धा वालकरच्‍या नृशंस हत्‍या प्रकरणाचा ! आफताब पूनावाला या मुसलमान तरुणाने राक्षसी पद्धतीने श्रद्धाचे ३५ तुकडे करून थंड डोक्‍याने ते शीतकपाटामध्‍ये (फ्रीजमध्‍ये) ठेवून नंतर जंगलात फेकले. त्‍यामुळे हेच सिद्ध होते की, ‘लव्‍ह जिहाद’ केवळ चर्चेचा कपोलकल्‍पित विषय नसून त्‍याचे दृश्‍य परिणाम समाजात उघड्या डोळ्‍याने दिसू लागले आहेत. तेव्‍हा देशातील हिंदु युवती आणि त्‍यांचे पालक यांनीही सजग होऊन या विषयाकडे गांभीर्याने पहावे, यासाठी सुप्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य आणि निहारिका-पोळ सर्वटे यांनी लिहिलेला हा परखड लेख…

लेखिका शेफाली वैद्य

१. बिगरमुसलमान मुलींना प्रेमाच्‍या जाळ्‍यात अडकवून त्‍यांचे धर्मांतर म्‍हणजे ‘लव्‍ह जिहाद’ !

उत्तरप्रदेशमधील एका महाविद्यालयात शिकणार्‍याने मुलीने ‘लव्‍ह जिहाद’विषयी प्रश्‍न विचारला, ‘‘राज्‍यघटनेने कुठल्‍याही सज्ञान भारतीय नागरिकाला स्‍वतःला हव्‍या त्‍या व्‍यक्‍तीशी विवाह करायचे अधिकार दिलेले आहेत. त्‍यामुळे प्रत्‍येक हिंदु-मुसलमान विवाह हा ‘लव्‍ह जिहाद’ समजायचा का ?’’ यावर तिला सांगितले, ‘‘प्रत्‍येक आंतरधर्मीय विवाह हा म्‍हणजेच ‘लव्‍ह जिहाद’ असू शकत नाही; पण बिगरमुसलमान मुलींना पद्धतशीरपणे प्रेमाच्‍या जाळ्‍यात अडकवून त्‍यांचे धर्मांतर करणे म्‍हणजे ‘लव्‍ह जिहाद’. स्‍वतः सर्वोच्‍च न्‍यायालयानेही ‘केरळमध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’ अस्‍तित्‍वात आहे’, हा ‘राष्‍ट्रीय तपास यंत्रणे’चा (‘एन्.आय.ए.’चा) युक्‍तीवाद ग्राह्य धरूनच त्‍यांना चौकशीचा आदेश दिला आहे.

२. सर्वोच्‍च न्‍यायालयाने लव्‍ह जिहादच्‍या प्रकरणात दिलेला आदेश

निहारिका पोळ-सर्वटे

हा आदेश सर्वोच्‍च न्‍यायालयाने ज्‍या प्रकरणात दिला, ते प्रकरण म्‍हणजे शफीन जहां या मुसलमान तरुणाने अथिया या हिंदु मुलीशी केलेला तथाकथित विवाह आणि त्‍या विवाहानंतर त्‍या मुलीने केलेले धर्मांतर. या प्रकरणात ‘एन्.आय.ए.’ची बाजू सर्वोच्‍च न्‍यायालयात मांडतांना अतिरिक्‍त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंग यांनी ‘हे प्रकरण केवळ आंतरधर्मीय विवाहाचे नसून हिंदू तरुणींना फूस लावून त्‍यांचे धर्मांतर घडवून आणण्‍याचा पद्धतशीर प्रयत्न केरळमध्‍ये होत आहे. या धर्मांतराची पाळेमुळे थेट इस्‍लामी आतंकवादापर्यंत पोचतात’, असे म्‍हटले होते. या आरोपाची गंभीर नोंद घेत सर्वोच्‍च न्‍यायालयाने हा चौकशीचा आदेश दिला आहे.

३. ‘हिंदु युवतींचे लग्‍नाआधी धर्मांतर का ?’, याविषयी तथाकथित ‘प्रागतिक’  विचारसरणी असलेले बोलतील का ?

खरेतर हे ‘लव्‍ह जिहाद’ प्रकरण नवे नाहीच. वर्ष २०१० मध्‍ये केरळचे तत्‍कालीन मुख्‍यमंत्री आणि कम्‍युनिस्‍ट (साम्‍यवादी) नेते अच्‍युतानंदन यांनीही ‘कडव्‍या इस्‍लामी संघटना ‘मॅरेज अँड मनि’ (लग्‍न आणि पैसा) ही दोन शस्‍त्रे वापरून केरळचे इस्‍लामीकरण करत आहेत’, असा गंभीर आरोप केला होता. केरळमधील चर्च आणि हिंदु संघटना यांनीही या आरोपाला पुष्‍टी दिली होती. काही दिवसांपूर्वी एका राष्‍ट्रीय न्‍यूज चॅनेलवरही ‘लव्‍ह जिहाद’ होत आहे आणि त्‍यासाठी काही कडव्‍या मुसलमान संघटनांनी ‘रेट कार्ड’ही (दरपत्रक) काढले आहे’, असा खळबळजनक आरोप करण्‍यात आला होता. तथाकथित ‘प्रागतिक’ विचारसरणीच्‍या लोकांचा यावरचा युक्‍तीवाद, म्‍हणजे ‘प्रेम हे धर्मातीत असते. त्‍यामुळे कुठल्‍याही हिंदु मुलीला मुसलमान मुलावर प्रेम करायचा आणि त्‍याचा धर्म स्‍वीकारायचा हक्‍क आहे.’ कायदेशीरदृष्‍ट्या हे योग्‍यच आहे; पण असे विवाह करणार्‍या मुली कुठल्‍या कुटुंबातून येतात ? विवाह करतांना त्‍यांची मानसिक स्‍थिती काय असते ? त्‍या मुसलमान होणार म्‍हणजे नक्‍की काय करणार ? या एका निर्णयामुळे त्‍यांच्‍या कायदेशीर हक्‍कांमध्‍ये काय तफावत पडू शकते, याची पूर्ण जाणीव त्‍यांना असते का ? ही सर्व सूत्रे महत्त्वाची आहेत. येथे मुद्दा दोन भिन्‍न धर्मीय लोकांनी प्रेमात पडण्‍याचा किंवा लग्‍न करण्‍याचाही नसून तो लग्‍नाआधी धर्मांतर करण्‍याचा आहे !

४. मुलींनी मुसलमान पुरुषाशी ‘विशेष विवाह कायद्या’खाली लग्‍न न केल्‍यामुळे होणारी हानी 

भारतीय घटनेनुसार दोन भिन्‍न धर्मीय व्‍यक्‍तींना आपापले धर्म न पालटता ‘स्‍पेशल मॅरेज अ‍ॅक्‍ट’खाली (विशेष विवाह कायद्याखाली) विवाह करता येतो. असा विवाह करणार्‍या स्‍त्रीचा कुठलाही कायदेशीर हक्‍क हिरावून घेतला जात नाही. प्रसंगी पतीशी न पटल्‍यास तिला न्‍यायालयात जाऊन घटस्‍फोट घेण्‍याचा, पोटगी मागण्‍याचा आणि नवर्‍याच्‍या मालमत्तेवर पत्नी म्‍हणून अधिकार सांगण्‍याचा हक्‍क आहे; पण ज्‍या स्‍त्रिया लग्‍नापूर्वी धर्मांतर करून ‘शरिया’ कायद्याखाली निकाह (विवाह) करतात, त्‍यांना मात्र या सगळ्‍या अधिकारांवर पाणी सोडावे लागते. मुसलमान पुरुषाला ‘शरिया’ कायद्यानुसार ४ वेळेला विवाह करायचा अधिकार आहे. त्‍याला पत्नीला आवाजी घटस्‍फोट द्यायचाही अधिकार आहे, जो अधिकार स्‍त्रीला नाही. मुसलमान पुरुष स्‍त्रीला ३ वेळा ‘तलाक’ म्‍हणून घटस्‍फोट देऊ शकतो; पण तो हक्‍क स्‍त्रीला नाही.

५. हिंदु मुलीची निकाह केल्‍याने होणारी कुचंबणा आणि त्‍याविषयी घडलेले प्रत्‍यक्ष उदाहरण

बहुतेक मुली पुष्‍कळ कोवळ्‍या वयात भावनेच्‍या भरात त्‍यांच्‍या प्रियकराच्‍या मानसिक दबावाला बळी पडून धर्मांतराचा निर्णय घेतात. तेव्‍हा त्‍यांना सांगितले जाते की, ‘निकाह’पुरता (विवाह) धर्म पालटायचा आहे. एकदा लग्‍न झाले, की मग ती मुलगी आपापल्‍या मूळ धर्माच्‍या चालीरिती पाळू शकते. त्‍या वेळेला मुलगी पुष्‍कळ दबावाखाली असते. तिच्‍या घरून तर अशा लग्‍नाला बहुधा प्रखर विरोध असतोच. त्‍यामुळे पळून जाऊन लग्‍न करण्‍याचा आततायी निर्णय तिने घेतला की, माहेरचा उरलासुरला आधारही तिच्‍यासाठी नष्‍ट होतो. मग निकाह करून नवर्‍याची मर्जी सांभाळत बसण्‍याखेरीज तिच्‍याजवळ दुसरा उपायच नसतो. माझ्‍या ओळखीच्‍या एका हिंदू मुलीने असाच वयाच्‍या १८ व्‍या वर्षी पळून जाऊन धर्मांतर करून एका मुसलमान मुलाशी निकाह केला; पण काही मासातच त्‍याचे खरे स्‍वरूप तिला कळून चुकले. तो माणूस तिला मारहाण करायला लागला. तिला आपल्‍या कुटुंबियांच्‍या करड्या नजरेच्‍या पहार्‍यात कोंडून ठेवायला लागला.

तिच्‍या सुदैवाने तिथल्‍याच एका सहृदय मुसलमान शेजारणीने तिला तिच्‍या माहेरच्‍या लोकांशी संपर्क साधायला साहाय्‍य केले आणि त्‍यांनी येऊन पोलिसांच्‍या साहाय्‍याने तिची सुटका केली. तिने मग रितसर विधीपूर्वक परत हिंदु धर्म स्‍वीकारला. तिने वकिलीचा अभ्‍यास पूर्ण केला आणि आज ती भाग्‍यनगरमध्‍ये ‘प्रॅक्‍टिस’ (व्‍यवसाय) करते. तिच्‍या सर्वाधिक पक्षकार आहेत ‘तिहेरी तलाक’ने (घटस्‍फोट) पीडित मुसलमान महिला ! ती मुलगी नशीबवान म्‍हणून त्‍या सापळ्‍यातून तिला बाहेर पडता आले; पण बर्‍याच वेळेला अशा मुलींना माहेरचा आधार तुटल्‍यामुळे आहे त्‍या परिस्‍थितीत दिवस काढावे लागतात. प्रख्‍यात कन्‍नड साहित्‍यिक एस्.एल्. भैरप्‍पा यांच्‍या ‘आवरण’ या कादंबरीत हा ‘लव्‍ह जिहाद’ कसा होतो, याचे फार प्रत्‍ययकारी वर्णन आहे.

६. पत्रकार सुनीला सोवनी यांनी ‘लव्‍ह जिहाद’विषयी लिहिलेल्‍या पुस्‍तकात दर्शवलेले वास्‍तव

पत्रकार सुनीला सोवनी यांनीही ‘लव्‍ह जिहाद’च्‍या प्रत्‍यक्ष प्रकरणांमध्‍ये अडकलेल्‍या तरुणी, त्‍यांचे आई-वडील आणि अन्‍य जणांना भेटून ‘लव्‍ह जिहाद – दबलेले भयानक वास्‍तव’ नावाचे एक छोटे पुस्‍तक लिहिले आहे. ते वाचले म्‍हणजे या प्रकरणांमधील सुसूत्रता लक्षात येते. सुनीला सोवनींच्‍या मते ‘लव्‍ह जिहाद’ला बळी पडणार्‍या बहुसंख्‍य मुली ‘कुणीतरी आपल्‍याकडे लक्ष द्यावे’, यासाठी इतक्‍या आसुसलेल्‍या असतात की, कुणीतरी प्रतिदिन आपल्‍याकडे बघतो, त्‍याचे हसणे आणि अन्‍य कुठलेही कारण त्‍यांच्‍यासाठी प्रेमात पडायला पुरेसे होते. एकदा मुलगी मुलाकडे आकर्षित झाल्‍यावर मुलाकडून तिच्‍यावर भेटवस्‍तूंचा वर्षाव करण्‍यात येतो. पुढचा टप्‍पा म्‍हणजे मुलगा मुलीला भ्रमणभाष संच घेऊन देतो आणि ‘घरच्‍यांना त्‍याविषयी सांगू नको, असे बजावतो’, अशा रितीने मुलीच्‍या घरच्‍यांना कळू न देता त्‍यांचा संपर्क बिनबोभाट चालू होतो. त्‍यात मुलगी शिक्षणासाठी दुसर्‍या शहरात रहात असेल, तर प्रकरण अजूनच सोपे होते. केरळमध्‍ये आपापली गावे सोडून शिक्षणासाठी म्‍हणून राहिलेल्‍या मुली अशा प्रेम प्रकरणांच्‍या शिकार होतांना दिसतात.

एकदा ‘प्रेम’ प्रकरण चालू झाले की, दुसरा टप्‍पा म्‍हणजे शारीरिक संबंध. सुनीला सोवनींच्‍या मते हा सगळ्‍यात धोकादायक टप्‍पा आहे. प्रेम सिद्ध करण्‍याचा एकमेव मार्ग म्‍हणजे प्रियकरासह हॉटेलमध्‍ये किंवा एखाद्या मित्राच्‍या घरी रहाणे. असे करण्‍यास नकार देणार्‍या मुलींवर भावनिक दबाव आणला जातो. शारीरिक भूक तर असतेच, त्‍यामुळे मुलगी प्रियकरासह जायला सिद्ध होते. लग्‍नाचे वचन तर त्‍याने दिलेलेच असते. एकदा शारीरिक संबंध आला की, मुलगी पुरतीच फसते. काही वेळेला तिचे चित्रीकरणही केले जाते. त्‍यामुळे तिच्‍या मनात बाहेर पडायचे आले, तरी या प्रकरणातून बाहेर पडू शकत नाही. याच कालावधीत निकाहची पूर्वसिद्धता म्‍हणून मुलीला इस्‍लामी रितीरिवाज पाळायचा आग्रह केला जातो. मुलगी घरी आपल्‍या आई-वडिलांसह रहात असली, तरी तिला त्‍यांच्‍यापासून लपून नमाजपठण वगैरे करायला सांगितले जाते. वाचायला पुस्‍तके दिली जातात.

शेवटचा टप्‍पा म्‍हणजे पद्धतशीर धर्मांतर करवून निकाहनामा करणे. बहुसंख्‍य मुली स्‍वतःच्‍या कायदेशीर हक्‍कांविषयी अगदीच अनभिज्ञ असतात. धर्मांतर केल्‍यामुळे आपण कुठल्‍या हक्‍कांवर पाणी सोडत आहोत, हे त्‍यांना मुळातच कळत नाही. त्‍यातही एखाद्या शिकलेल्‍या जागरूक मुलीने ‘स्‍पेशल मॅरेज अ‍ॅक्‍ट’खाली विवाह करायची गोष्‍ट काढलीच, तर ‘मला धर्माचे काही नाही; पण माझ्‍या आई-वडिलांच्‍या खुशीसाठी तू एवढेही करू शकत नाहीस का ? हेच का तुझे माझ्‍यावरचे प्रेम ?’, वगैरे भावनिक ‘ब्‍लॅकमेल’ करून मुलीला निकाहनामा करण्‍यासाठी वळवले जाते. एव्‍हाना मुलगी मुलामध्‍ये मानसिक आणि शारीरिक दृष्‍ट्या इतकी गुंतलेली असते की, ती सारासार विचार करण्‍याच्‍या पलीकडे गेलेली असते. मुलीच्‍या आई-वडिलांना कळलेच, तर बर्‍याचदा ते ही ‘आता ती आम्‍हाला मेली’, असे म्‍हणून तिच्‍याकडे पाठ फिरवतात, त्‍यामुळे तिच्‍यापुढे दुसरा काही पर्यायही राहिलेला नसतो. आपल्‍या मुलीच्‍या भल्‍यासाठी केरळ उच्‍च न्‍यायालयापर्यंत धाव घेणारे अथियाच्‍या वडिलांसारखे पिता विरळाच.

७. लव्‍ह जिहादच्‍या प्रकरणांची चौकशी देशाच्‍या सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने महत्त्वाची !

‘जरी एखाद्या केसमध्‍ये मुलीने धर्मांतर केले नाही, तरी या विवाहातून होणारी मुले मात्र इस्‍लाम धर्मीयच असतील’, असा अलिखित करार असतो. एव्‍हाना ‘ब्रेनवॉश’ झालेल्‍या मुली हे सगळे मान्‍यही करतात. ‘या सगळ्‍यासाठी आखाती देशांमधून प्रचंड प्रमाणात पैसा येतो’, असे ‘एन्.आय.ए.’चे म्‍हणणे आहे. अशा धर्मांतर झालेल्‍या कित्‍येक युवती केरळमधून ‘इसिस’च्‍या ‘धर्मयुद्धात’ सामील होण्‍यासाठी सीरियाला गेल्‍याची अनेक प्रकरणे केरळ पोलिसांकडे आहेत. भिन्‍न धर्मीय विवाह होऊच नयेत, असे कुणीच म्‍हणणार नाही. २१ व्‍या शतकात आपला जोडीदार स्‍वतः निवडायचा हक्‍क सगळ्‍यांनाच आहे; पण आपण धर्मांतर करतो म्‍हणजे काय करतो ? याची पूर्ण कल्‍पना ते करणार्‍या मुलींना आहे का ? अशा विवाहांमध्‍ये पैशाची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण होते आहे का ? असे विवाह करणार्‍या मुलींचे पुढे काय होते ? नवर्‍याने ‘तलाक’ देऊन हाकलून दिले, तर तिच्‍यापुढे नक्‍की कुठला मार्ग असतो ? असे विवाह करणार्‍या लोकांशी कडव्‍या इस्‍लामी संघटनांचा नक्‍की काय संबंध असतो ? या सगळ्‍या गोष्‍टींची चौकशी करणे, हे देशाच्‍या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. म्‍हणूनच ‘लव्‍ह जिहाद’ हे प्रकरण केवळ दोन भिन्‍न धर्मीय व्‍यक्‍तींपुरतेच मर्यादित रहात नाही !

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, १९.११.२०२२)