प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष सत्‍यजीत तांबे निलंबित !

सत्‍यजीत तांबे

मुंबई – नाशिक विभाग पदवीधर विधान परिषदेच्‍या निवडणुकीत बंडखोरी करून उमेदवारी अर्ज प्रविष्‍ट करून पक्षशिस्‍तीचे उल्लंघन केल्‍याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नानाभाऊ पटोले यांनी प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष सत्‍यजित तांबे यांना १९ जानेवारी या दिवशी निलंबित केले आहे.

पत्रकारांशी बोलतांना नाना पटोेले म्‍हणाले की, विधान परिषदेच्‍या ५ जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्‍या उमेदवार शुभांगी पाटील आणि नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. नाशिक मतदारसंघातील घटनांमुळे डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने निलंबित केले असून सत्‍यजित तांबे यांच्‍यावरही कारवाई केली आहे.