(म्हणे) ‘आम्हाला शक्य होईल, तितके पाकिस्तानला साहाय्य करू !’ – अमेरिका

वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकिस्तानमधील आर्थिक संकट एक आव्हान आहे आणि त्यावर आमचे लक्ष आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था यांच्याशी चर्चा करत आहे. आम्ही आमच्या स्तरावर काही करता येईल तेवढे पाकिस्तानला साहाय्य करण्याचा प्रयत्न करू; मात्र सध्यातरी हे पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था यांच्यातील प्रकरण आहे. आम्हाला वाटते की, पाकिस्तान आर्थिक स्तरावर स्वावलंबी बनावे, असे मत अमेरिकेने पाकच्या सध्याच्या आर्थिक स्थितीवरून व्यक्त केले आहे.

संपादकीय भूमिका 

अमेरिकेने यापूर्वी पाकला जे काही कोट्यवधी रुपयांचे साहाय्य केले, ते कुठे गेले, त्याचे काय झाले ? याचीही विचारणा अमेरिकेने पाकला करण्याची आवश्यकता आहे !