कोल्‍हापूर येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव यांना श्रीमती भारती पालन (वय ६५ वर्षे) यांची ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी झाल्‍याविषयी मिळालेली पूर्वसूचना

१. स्‍वागतकक्षाच्‍या जवळील आसंदीवर बसलेल्‍या श्रीमती भारती पालनकाकूंकडे पाहून ‘त्‍या स्‍थिर आणि शांत असून देवाच्‍या अनुसंधानात आहेत’, असे वाटणे आणि स्‍वतःलाही त्‍यांच्‍यासारखे स्‍थिर अन् शांत रहाता येऊ दे’, अशी देवाला प्रार्थना करणे 

वैद्या (कु.) सुजाता जाधव

‘५.११.२०२२ या दिवशी रात्री मी निवासस्‍थानी जाण्‍यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाच्‍या स्‍वागतकक्षात गाडीच्‍या प्रतीक्षेत उभी होते. त्‍या वेळी तेथे आसंदीवर एक काकू (श्रीमती भारती पालनकाकू) बसल्‍या होत्‍या. त्‍यांच्‍या चेहेर्‍याकडे पाहून ‘त्‍या देवाच्‍या अनुसंधानात आहेत’, असे मला वाटले. बाहेर साधकांची पुष्‍कळ वर्दळ होती; परंतु ‘त्‍या शांत आणि स्‍थिर आहेत’, असे मला वाटले. त्‍या वेळी त्‍यांना नाव विचारून त्‍यांच्‍या अनुसंधानात व्‍यत्‍यय आणू नयेे, यासाठी मी अन्‍य साधिकेला त्‍यांचे नाव विचारले. तेव्‍हा ‘त्‍यांची आध्‍यात्मिक पातळी चांगली असावी’, असे मला वाटले. तेव्‍हा ‘मलाही त्‍यांच्‍यासारखे स्‍थिर आणि शांत रहाता येऊ दे’, अशी मी देवाला प्रार्थना केली.

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘श्रीमती भारती पालन यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी प्राप्‍त केली आहे ’, अशी घोषणा करून सर्वांना आनंद देणे

श्रीमती भारती पालन

६.११.२०२२ या दिवशी सौ. स्‍वाती शिंदे यांनी मला सभागृहात सत्‍संगाला येण्‍याचा निरोप दिला. त्‍या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘श्रीमती भारती पालन यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी प्राप्‍त केली आहे आणि त्‍यांना गुरुदेवांनी जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त केले आहे’, अशी घोषणा करून सर्वांना आनंद दिला. त्‍या वेळी माझ्‍या अंगावर रोमांच उभे राहून मनात कृतज्ञताभाव दाटून आला.’

– वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव, कोल्‍हापूर (९.११.२०२२)