साधकांना सूचना आणि ज्योतिषी, वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
‘ज्योतिषशास्त्र’ ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. ज्योतिषशास्त्राद्वारे व्यक्तीचे प्रारब्ध, स्वभाव, कार्यक्षेत्र, तिला असलेले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवरील त्रास इत्यादी गोष्टींविषयी जाणून घेता येते. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ज्योतिषशास्त्राच्या संवर्धनासाठी संशोधन कार्य चालू आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे संशोधन आध्यात्मिक विषयांवर करण्यात येत आहे. या कार्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे.
सध्या फोंडा, गोवा येथील संशोधन केंद्रात ज्योतिषशास्त्राच्या संबंधी पुढील सेवा उपलब्ध आहेत.
१. आध्यात्मिक विषयांवर ज्योतिषशास्त्रीय संशोधन करणे
१ अ. दैवी बालकांच्या जन्मकुंडलीतील विशेष योगांच्या संदर्भात संशोधन करणे : ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतलेल्या १ सहस्र १५० पेक्षा अधिक दैवी बालकांना ओळखले आहे. संतांनी सांगितल्यानुसार पुढे हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर हेच बालक हिंदु राष्ट्रात सुव्यवस्था निर्माण करतील. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून या बालकांच्या कुंडलीतील विशेष योगांच्या संदर्भात संशोधन करायचे आहे. उच्च स्वर्गलोक, महर्लोक आणि जनलोक येथून पृथ्वीवर जन्म घेतलेल्या दैवी बालकांच्या जन्मकुंडल्या संशोधनासाठी उपलब्ध आहेत.
१ आ. ‘मृत्यूकुंडली’च्या संदर्भातील संशोधन : व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरून तिचे या जन्मातील प्रारब्ध कळते, तर मृत्यूकुंडलीवरून व्यक्तीने या जन्मात केलेल्या कर्मामुळे तिच्या प्रारब्धात झालेली वाढ किंवा घट कळते. सर्वसामान्य व्यक्ती, चांगला साधक, संत आणि सद़्गुरु यांच्या मृत्यूकुंडल्यांचे विवेचन करून साधना केल्यामुळे व्यक्तीच्या प्रारब्धावर झालेला परिणाम अभ्यासता येऊ शकतो.
१ इ. आवश्यक कौशल्य : या सेवेसाठी ज्योतिषशास्त्राचे माध्यमिक ज्ञान आणि संगणक हाताळता येणे आवश्यक आहे. (ही सेवा घरी राहूनही करता येईल.)
२. समाजासाठी उपयुक्त अशा विषयांवर ज्योतिषशास्त्रीय संशोधन करणे
ज्योतिषशास्त्राद्वारे संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि राष्ट्रावरील संकटे यांविषयी अंदाज घेता येतो. ज्योतिषशास्त्राद्वारे अशा सामाजिक घटनांचा वेध घेणे, त्याविषयी समाजाला सजग करणे आणि साधनेस प्रवृत्त करणे आवश्यक आहे.
२ अ. आवश्यक कौशल्य : यासाठी मेदिनीय (राष्ट्रीय) ज्योतिषशास्त्राचे जाणकार हवेत. (ही सेवा घरी राहूनही करता येईल.)
३. ज्योतिषशास्त्र विषयक ग्रंथांची निर्मिती करणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संग्रहात ज्योतिषासंबंधी तात्त्विक माहिती आणि विश्लेषणात्मक लिखाण उपलब्ध आहे, तसेच ज्योतिषविषयक ३५० हून अधिक ग्रंथ उपलब्ध आहेत. उपलब्ध लिखाण आणि नवीन संशोधन यांच्या आधारे आध्यात्मिक अन् समाजासाठी उपयुक्त अशा विषयांवर ज्योतिषविषयक ग्रंथांची निर्मिती करण्याचा मानस आहे. ग्रंथांची निर्मिती जलद गतीने व्हावी, यासाठी लिखाणाचे संकलन करणे, ग्रंथांच्या अनुक्रमणिका सिद्ध करणे, अनुक्रमणिकेनुसार लिखाण लावून घेऊन त्याचे अंतिम संकलन करणे इत्यादी सेवांसाठी साधकांची आवश्यकता आहे.
३ अ. आवश्यक कौशल्य : यासाठी ज्योतिषशास्त्राचे प्राथमिक ज्ञान, तसेच संगणक हाताळता येणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे व्याकरण आणि शब्दरचना यांचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे. यामुळे ग्रंथसंकलन शिकवणे सुलभ होईल.
४. ज्योतिष अधिवेशनांमध्ये ज्योतिषाच्या संदर्भातील संशोधन सादर करणे
अनेक राज्यांत विविध ज्योतिष संस्थांकडून ज्योतिष अधिवेशने आयोजित केली जातात. त्यात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले ज्योतिषाविषयीचे संशोधन सादर करण्याची सेवा उपलब्ध आहे.
वरील सेवा करण्यास इच्छुक असल्यास; परंतु या सेवेचे कौशल्य नसल्यास संबंधितांना त्या संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येईल. वरील सेवा करू इच्छिणार्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार आपली माहिती [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा टपाल पत्यावर पाठवावी. ई-मेल पाठवतांना त्याच्या विषयामध्ये ‘ज्योतिष सेवा’ (Jyotish Seva) असा कृपया उल्लेख करावा.
टपालासाठी पत्ता
श्री. आशिष सावंत, द्वारा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’, भगवतीकृपा अपार्टमेंट्स, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१
१४ विद्यांपैकी एक असलेल्या ज्योतिषशास्त्राच्या वरील सेवांमध्ये सहभागी होऊन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन कार्यात योगदान द्या !