इजिप्तची आर्थिक स्थिती बिकट

कायरो – पाकिस्ताननंतर आता इजिप्तचीही आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. देशात महागाई इतकी वाढली आहे की, गरिबांना दोन वेळचे अन्न मिळणेही कठीण झाले आहे. अन्नधान्याच्या आयातीवर अवलंबून असलेल्या या देशातील महागाईने अनुमाने १० कोटी लोकांना आर्थिक संकटात टाकले आहे. येथे तांदूळ, तेल, दूध यांसारख्या जीवनावायक वस्तूंच्या पुरवठ्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.